पाकिस्तानचा ख्वाजा आसिफ चवताळला, भारताबद्दल गरळ ओकली, म्हणाला आता चर्चा नाही, थेट…
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात मोठा संघर्ष चालू आहे. याच संघर्षावर पाकिस्तानने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्ताने भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

Pakistan And Afghanistan War : भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान नेहमीच काहीतरी कुरपाती काडत असते. आता या देशाचे अफगाणिस्तानसोबत युद्ध चालू आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हल्ले केले जात आहेत. तर अफगाणिस्तानदेखील प्रत्युत्तरदाखाल पाकिस्तानवर जोरदार हल्ले करत आहे. दरम्यान, आता पाकिस्तानने अफगाणिस्तानला उघड धमकी दिली आहे. सोबतच पाकिस्तानने भारतावरही गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आता जगभरात एकच खळबळ उडाली असून. भारत काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकी काय धमकी दिली?
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे संरक्षणंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानसोबतच्या युद्धावर भाष्य केले आहे. त्यांनी अफगाणिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सोबतच त्यांनी भारतावरही गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानविरोधात जेथे जेथे दहशवतादाची मुळं असतील तेथे आम्ही कारवाई करू. सोबतच दहशतवाद पोसणाऱ्यांना आता मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशाराच ख्वाजा आसिफ यांनी दिला. गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानचे काही लोक पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत. या सर्व लोकांनी आता पाकिस्तान सोडून परत अफगाणिस्तानात परतायला हवे, असे मतही ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केले.
आता शांततेचे आवाहन
आमची जमीन ही 35 कोटी पाकिस्तानी नागरिकांची आहे. ही जमीन अफगाणी लोकांसाठी नाही, अशी कठोर भूमिकाही आसिफ यांनी घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नात अनेकांनी प्राणांचे बलिदान केले. मात्र काबुलकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेली नाही. आता मात्र निषेधाची पत्रं आणि शांततेचे आव्हान केले जाणार नाही. आमच्याकडून कोणतेही प्रतिनिधीमंडळ काबूलला जाणार नाही, असे सांगत भविष्यात पाकिस्तान अफगाणिस्तानसंदर्भात कठोर भूमिका घेणार आहे, असे संकेत ख्वाजा आसिफ यांनी दिले.
भारतावर नेमके काय आरोप लावले?
ख्वाजा आसिफ यांनी भारतावरही काही आरोप केले आहेत. अफगाणिस्तान आता भारताची भाषा बोलू लागला आहे. अफगाणिस्तान भारताचा प्रतिनिधी बनला आहे. तहरिक ए तालिबा पाकिस्तान (टीटीपी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या तसेच भारातासोबत मिळून अफगाणिस्तान पाकिस्तानविरोधी कट रचत आहे. काबुलचे शासक भारतासोबत जाऊन बसले आहेत, असे मत ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, त्यांनी अफगाणिस्तान भारताच्या साथीने पाकिस्तानविरोधी कारवाया करत आहे, असा आरोपच आसिफ यांनी केला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
