AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Munir : गजब बेइज्जती है यार…चीनने पाक आर्मी चीफ मुनीरसोबत हे काय केलं?

Asim Munir : पाकिस्तान चीनला आपला सर्वात जवळचा मित्र मानतो. पैशापासून ते शस्त्रापर्यंत आणि इतरही अनेक गोष्टींसाठी पाकिस्तान चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पाकिस्तान चीनच्या मैत्रीचे खूप दाखले देत असतो. पण त्याच पाकिस्तानच्या आर्मी चीफसोबत चीनमध्ये हे काय झालं?गजब बेइज्जती है यार...

Asim Munir : गजब बेइज्जती है यार...चीनने पाक आर्मी चीफ मुनीरसोबत हे काय केलं?
Pakistan Army Chief in China
| Updated on: Jul 26, 2025 | 1:38 PM
Share

पाकिस्तानचा जिहादी विचारांचा लष्करप्रमुख असीम मुनीर चीन दौऱ्यावर आहे. इथे तो चीन-पाकिस्तान मैत्रीचे दाखले देत आहे. चीन आणि पाकिस्तान परस्परांचे विश्वासू सहकारी असल्याच म्हटलं जातं. पाकिस्तानी मीडियामध्ये सुद्धा या मैत्रीची खूप चर्चा असते. पण वास्तव काहीतरी वेगळं आहे. चीनमध्ये गेलेल्या मुनीरचे फोटो नीट बघितले तर लक्षात येईल की, पाकिस्तानी आर्मी चीफची तिथे इज्जत निघाली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतल्यानंतर उप राष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेण्याआधी मुनीरची टोपी उतरवण्यात आली. त्याशिवाय पाकिस्तानात चिनी नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांवरुन मुनीरला भरपूर काही सुनावण्यात आलं.

पाकिस्तानचे आर्मी चीफ आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भेटीदरम्यान वांग यी यांनी पाकिस्तानातील चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्द उपस्थित केला. CPEC कॉरिडोर आणि चिनी नागरिकांच्या सुरक्षेत कमी पडल्याबद्दल पाकिस्तानी आर्मी चीफला भरपूर सुनावण्यात आलं. पाकिस्तान त्यांच्या देशात राहणाऱ्या चिनी नागरिकांच्या सुरक्षेप्रती गंभीर आहे, हे मुनीरने पटवून देण्याचा प्रयत्न केला.

टोपी गायब कशी झाली?

जनरल मुनीरने जेव्हा परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली, तेव्हा त्याच्या डोक्यावर टोपी होती. पण जेव्हा तो उप राष्ट्रपती हान झेंग यांना भेटायला पोहोचला, त्यावेळी मुनीरच्या डोक्यावर टोपी नव्हती. सांगितलं जातय की, चीनने मुनीरची टोपी उतरवली. या भेटीआधी मुनीर जेव्हा गार्ड ऑफ ऑनर स्वीकारण्यासाठी पोहोचला, त्यावेळी त्याच्या डोक्यावर कॅप दिसतेय उप राष्ट्रपती हान सोबत फोटो काढण्याआधी टोपी गायब होती.

ISPR कडून खोटा प्रचार

मुनीरच्या चीन दौऱ्याची पाकिस्तानी मीडियामध्ये भरपूर चर्चा आहे. ISPR ने रिलीज केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलय की, चीनकडून पाकिस्तानी सैन्याच भरपूर कौतुक करण्यात आलं. बीजिंगमध्ये चिनी राजनैतिक अधिकारी आणि सैन्यासोबत पाक आर्मी चीफच्या बैठका झाल्या. CPEC कॉरिडोर आणि भू राजकीय आव्हान हा या बैठकीत चर्चेचा विषय होता. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांबद्दल समाधान व्यक्त केलं. दीर्घकाळ सहकार्याची कटिबद्धता व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.