AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वांसमोर महिला पत्रकाराला डोळा मारला… पाकिस्तानी सैन्याच्या बड्या व्यक्तीचं थर्ड क्लास कृत्य; थेट… जगभर छि थू…

पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी महिला पत्रकार अब्सा कोमल यांना प्रश्न विचारताना डोळा मारला, ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. इम्रान खान यांना 'ज़ेहनी मरीज़' म्हणण्याच्या त्यांच्या वक्तव्यावरही लोकांनी आक्षेप घेतला आहे. या घटनेमुळे सार्वजनिक व्यासपीठावरील अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वांसमोर महिला पत्रकाराला डोळा मारला... पाकिस्तानी सैन्याच्या बड्या व्यक्तीचं थर्ड क्लास कृत्य; थेट... जगभर छि थू...
पाकिस्तानी सैन्याच्या बड्या व्यक्तीची पत्रकार परिषदेतच थर्ड क्लासगिरीImage Credit source: X (Twitter)
| Updated on: Dec 10, 2025 | 11:48 AM
Share

पाकिस्तानमध्ये लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकार अब्सा कोमल हिला पाहून ते डोळा मारताना दिसले. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगगाने व्हायरल झाला, लोकांनी त्यांच्या वागण्यावर प्रचंड टीका केली आहे.

पाकिस्तानमधील पत्रकार परिषदेदरम्यान लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एका महिला पत्रकाराला प्रश्न विचारताना डोळा मारताना दिसत आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर तर गदारोळ माजला असून लोकांनी त्यांच्यावर टीका करत हे कृत्य अशोभनयी असल्याचं म्हटलं आहे. खरंतर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी हे एका पत्रकार परिषदेत होते, तिथे एका महिला पत्रकार अब्सा कोमल यांनी चौधरी यांना इम्रान खान यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारले. पण याच दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये चौधरी हे हसत, त्या पत्रकाराला “डोळा मारताना” दिसले. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने ऑनलाइन पसरला आणि त्यावर खूप टीका झाली आहे.

सतत चर्चेत असतात जनरल चौधरी

इम्रान खान यांच्यावर लावलेले राष्ट्रीय सुरक्षेला धोका, देशद्रोही आणि दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे आरोप, याबद्दल पत्रकार अब्सा कोमल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचं उत्तर देताना , चौधरी विनोदाने म्हणाले, “आणखी एक (आरोप) गोष्ट जोडा – तो (‘ज़ेहनी मरीज़) मानसिकदृष्ट्या आजारी आहे,” आणि हे बोलून नंतर त्यांनी पत्रकाराला डोळा मारला. मात्र त्यांचं हे वर्तन अनेकांना आवडलं नसून कित्येक नेटकऱ्यांनी त्याचं हे वागणं “अव्यावसायिक” असल्याचं म्हणत टीकास्त्र सोडलं.

सार्वजनिक व्यासपीठावर एक गणवेशधारी अधिकारी असं कसं वागू शकतो, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदांमध्ये अनेक टीकात्मक विधाने करून आणि इम्रान खानवर जोरदार शाब्दिक हल्ला करून जनरल चौधरी हे वारंवारचर्चेत येत अतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील वादग्रस्त आहे, कारण त्यांचे वडील यापूर्वी दहशतवादी कारवायांशी जोडले गेल्याचा आरोप होता.

‘ज़ेहनी मरीज़’ म्हणजे काय ?

‘ज़ेहनी मरीज़’ हा एक उर्दू शब्द आहे. त्याचा साधारण अर्थ – मानसिकदृ्ष्ट्या आजारी व्यक्ती – असा अर्थ होतो. म्हणजेच ज्याची मानसिक स्थिती चांगली नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती. हा शब्द अनेकदा टोमणा किंवा अपमान म्हणून वापरला जातो.चौधरी यांनी याच शब्दाचा वापर केला असून त्यांच्या एकदंर कृतीमुळेच मोठी टीका केली जात आहे. अलिकडेच, चौधरी यांनी इम्रान खान यांना ‘अहंकारी’ आणि ‘मानसिक आजारी’ म्हटले होते आणि त्यांच्यावर लष्कराविरुद्ध खोट्या कथा रचल्याचा आरोपही केला होता.

कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा.
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्....
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.