Pakistan Attack Kabul : पाकिस्तानचा एअर स्ट्राइक यशस्वी, कोण आहे नूर वली महसूद? ज्याला मारण्यासाठी 48 लाखांची वस्ती असलेल्या काबूलवर हल्ला
Pakistan Attack Kabul : कोण आहे नूर वली महसूद? ज्याला मारण्यासाठी 48 लाखांची वस्ती असलेल्या काबूलवर हल्ला केला. पाकिस्तान या नूर वली महसूदला आपला सर्वात मोठा दुश्मन मानतो. पाकिस्तानने काल रात्री थेट अफगाणिस्तानच्या राजधानी एअर स्ट्राइक केला.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये काल रात्री पाकिस्तानने एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यात पाकिस्तानला यश मिळालं आहे. पाकिस्तानी एअर स्ट्राइकमध्ये तालिबानी नेता नेता नूर वली महसूदची हत्या झाली आहे. अमू टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलय. नूर वली तहरीक-ए-तालिबानचा प्रमुख होता. पाकिस्तानने तहरीक-ए-तालिबानला दहशतवादी संघटना ठरवलय. नूरच नाव पाकिस्तानच्या हिटलिस्टमध्ये सर्वात वर होतं. नूरच्या हत्येमध्ये पाकिस्तानसोबत अमेरिकेचा सुद्धा महत्वाचा रोल मानला जात आहे. कारण काबूलवर एअर स्ट्राइक करण्याआधी पाकिस्तानने अमेरिकेची परवानगी घेतली होती. नूरला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलय. त्याच्यावर 50 लाख डॉलरच इनाम होतं.
मुल्ला फ़ज़लुल्लाहच्या हत्येनंतर नूर वली महसूदने 2018 साली तहरीक-ए-तालिबानची कमान संभाळलेली. त्यावेळी अफगाणिस्तानात अमेरिकेच नियंत्रण होतं. टीटीपीने तालिबान सोबत मिळून अमेरिकी सत्तेला हादरे दिले. अखेरीस अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावं लागलं. महसूदच्या काळात तहरीक-ए-तालिबानने पाकिस्तानला चांगलच जेरीस आणलं. त्यांच्या सत्तेला हादरे दिले. टीटीपीने या वर्षभरात पाकिस्तानवर 700 पेक्षा जास्त हल्ले केले आहेत. यात 270 पेक्षा जास्त पाक सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
बेनजीर भुट्टो यांच्या हत्येबद्दल मोठा खुलासा
टीटीपीचा प्रमुख म्हणून नूर वलीने नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफजईच्या हत्येचा आदेश दिलेला. त्यानंतर मलालावर तालिबानी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. नूर तालिबानचा पहिला दहशतवादी आहे, ज्याने पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्या हत्येबद्दल अनेक खुलासे केले. नूरने पहिल्यांदा कबूल केलेलं की, बेनजीर यांच्या हत्येमध्ये तालिबानी दहशतवाद्यांची महत्वाची भूमिका आहे.
पाकिस्तानच्या एअर स्ट्राइकमध्ये एकूण किती जण ठार?
नूर वलीला संपवण्यासाठी पाकिस्तानने जो एअर स्ट्राइक केला, त्यात 12 जणांचा मृत्यू झाला. तालिबानने काबुल हल्ल्याला त्यांच्या संप्रभुतेच उल्लंघन म्हटलं आहे. आता तालिबानची प्रतिक्रिया काय असेल? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. तालिबानने आधीच पाकिस्तानला इशारा दिलाय की, त्यांच्या एरियात घुसण्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. काबूल हल्ल्यानंतर आता म्हटलं जातय की, तालिबान पाकिस्तान विरुद्ध मोठ्या युद्धाची सुरुवात करु शकतो.
