AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी नागरिकांची जीवन मरणाची लढाई सुरुच; आधी महापूर आता गंभीर आजाराचा विळखा

पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे उपचार करताना अडचणी जाणवत आहेत. काही नागरिक उपचाराविना तडफडून मृत्यू पावल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानी नागरिकांची जीवन मरणाची लढाई सुरुच; आधी महापूर आता गंभीर आजाराचा विळखा
| Updated on: Sep 12, 2022 | 1:37 PM
Share

नवी दिल्लीः पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरातून पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतर व्हावे लागले आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. पाण्यामुळे आणि घाणीचे साम्राज्य पसरल्याने मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडले आहेत. गंभीर आजारांची परिस्थिती (Critical illness conditions)  निर्माण झाली असली औषधांचा तुटवडाही निर्माण झाला आहे. जी काही औषधं मिळत आहेत, त्यांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्याने पाकिस्तानातील परिस्थिती गंभीर झाली आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे लोकांना उपचार घेता येणे अवघड झाले आहे. गंभीर आजाराने ग्रासलेल्या लोकांसाठी ही जीवन-मरणाचीच लढाई सुरू आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सध्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. पाकिस्तानात एकीकडे औषधांचा तुटवडा जाणवत आहे तर दुसरीकडे मात्र औषधांच्या किंमतीत 21 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या समस्येवर पाकिस्तानच्या फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे की, उत्पादन खर्च जास्त आणि जास्त विक्री करामुळे औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.

सरकारी आणि खासगी रुग्णालयांत टंचाई

पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे उपचार करताना अडचणी जाणवत आहेत. काही नागरिक उपचाराविना तडफडून मृत्यू पावल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

ज्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे ती औषधे ना सरकारी दवाखान्यात मिळतात ना खासगी दवाखान्यात त्यामुळे लोकांचा उपचाराविना जीव जात आहे.पाकिस्तानचे औषध नियामक प्राधिकरणानेदेखील औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

या आजारांवर औषधच नाहीत

पाकिस्तानातील पुरग्रस्त नागरिकांना मानसिक ताणतणाव, सांधेदुखी, दमा, कर्करोग अशा आजारांनी ग्रासले आहे. तर दुसरीकडे फुफ्फुसातील संसर्ग, रक्त पुरवठा करण्यातही पाकिस्तानी अपयशी ठरले असून औषधांच्या तुटवड्यामुळे लोकांचा हाकनाक जीव जात आहे.

पंजाब प्रांतात मधुमेह, पोटाची जळजळ, रक्तदाब आणि हिपॅटायटीसची औषधे उपलब्ध होणे अवघड होणे कठीण झाले आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.