पाकिस्तानला फुटला घाम, शाहबाजला ज्याची भीती तेच झालं, उभं राहिलं मोठं संकट!
पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानला ज्याची भीती होती, आता तेच संकट समोर आलं आहे.

Pakistan TTP Organisation : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीक वाढली आहे. या दोन्ही देशांनी वेगवेगळ्या स्तरावर सहकार्य करण्यावर सहमती दर्शवलेली आहे. पण पाकिस्तानपुढे आता मोठं संकट उभं ठाकलं आहे. कारण गेल्या काही वर्षांत पाकिस्तानने ज्याचा संयुक्त राष्ट्रात उल्लेख केला होता, आता तेच संकट पाकिस्तानपुढे उभं ठाकलं आहे. विशेष म्हणजे बांगलादेशमध्ये झालेल्या एका कारवाईमुळे पाकिस्तानला या संकटाची आता नव्याने चाहूल लागली आहे.
नेमकं काय घडलंय?
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील एक दहशतवादी संघटना आता बांगलादेशमध्ये सक्रिय झाल्याचं समोर आलं आहे. बांगलादेशमधील दहशतवादविरोधी विभागाने पाकिस्तानाीतल तहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेशी संबंध असणऱ्या एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. या व्यक्तीचे नाव फैजल असून त्याला सावर या भागातून अटक करण्यात आली आहे.
टीटीपी या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानात बंदी आहे. याआधी पाकिस्तानमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये टीटीपी या संघटनेचाच हात आहे. याच दहशतवादी संघटनेचा नायनाट व्हावा यासाठी हा मुद्दा यूएनमध्ये उपस्थित केला होता. अफगाणिस्तानमधील तालिबानकडून या संघटनेला खतपाणी घातले जाते, असा आरोप पाकिस्तानने केला होता. आता हीच दहशतवादी संघटना बांगलादेशमधून आपले सूत्र हालवत असल्याचे समोर आले आहे.
नेमकी अटकेची कारवाई कशी केली?
पाकिस्तानच्या ATU ने 2 जुलै रोजी एक मोठी कारवाई केली होती. त्यांनी फैजल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने अन्य चार लोकांना जाऊन अफगाणिस्तानमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले होते. पोलिसांच्या माहितीनुसार तो गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात अफगाणिस्तानमध्ये गेला होता. तेथे त्याच्यासोबत 23 वर्षांचा अहमद झुबैर उर्फ युवराज हादेखील होता. हाच युवराज नंतर पाकिस्तानी सैन्याच्या एका कारवाईत मारला गेला होता. अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन तो दुबईमार्गे परत बांगलादेशात परतला होता. झुबैर फगाणिस्तानमध्येच थांबला होता.
टीटीपी दहशतवादी संघटनेने काय उपद्रव घातलाय?
पाकिस्तानमध्ये टीटीपी या दहशतवादी संघटनेने मोठा उपद्रव घातलेला आहे. पाकिस्तानी सरकारच्या म्हणण्यांनुसार 2024 साली याच संघटनेमुळे एकूण 588 लोकांचा मृत्यू झाला होता. यात पाकिस्तानी सैनिक आणि अधिकाऱ्यांचाही समावेश होता. फैजल बांगलादेशात तेथील कट्टरपंथी तरुणांना एकत्र करत होता.
