जगावर मोठं संकट, पृथ्वी नष्ट होणार, पाकिस्तानातून आलेल्या भविष्यवाणीने खळबळ, आकाशातून थेट…
एका पाकिस्तानी भविष्यवेत्त्याने केलेल्या भविष्यवाणीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्याने जग नष्ट होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पृथ्वीवर कधी काय होईल हे सांगता येत नाही. पृथ्वीवरील बऱ्याच गोष्टींचे गुढ अजूनही मानसाला उकललेले नाही. अंतराळात तर असे काही चमत्कार घडत असतात की ते पाहून आपण थक्क होऊन जातो. अनेकदा अंतराळातून पृथ्वीला नष्ट करणारी गोष्ट वेगाने येत असल्याचा दावा केला जात जातो. असे असतानाच आता आणखी एक मोठी आणि हादरवून टाकणारी भविष्यवाणी समोर आली आहे. या भविष्यवाणीमुळे आता सगळीकडे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानी भविष्यवेत्ते रियाज अहमद गौहर शाही यांनी ही भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच एक मोठा धूमकेतू पृथ्वीवर आदळळणार आहे. या धूमकेतूमळे मोठा पू र येणार आहे. ज्या दिवशी हा धूमकेतू पृथ्वीवर आदळेल त्याच दिवशी सर्व मानवजात नष्ट होईल, असा दावा या भविष्यवाणीत केलेला आहे.
लवकरच धूमकेतू पृथ्वीवर आदळणार?
ब्रिटिश वर्तमानपत्र डेली मेलने या भविष्यवाणीबाबत एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार 2000 साली रियाज अहमद गौहर शाही यांनी त्यांच्या द रिलिजन ऑफ गॉड या पुस्तकात या धूमकेतूबाबत लिहिलेलं आहे. पृथ्वीच्या दिशेने एक धूमकेतू पाठवलेला आहे. हा धूमकेतू पुढच्या वीस ते पंचवीस वर्षात पृथ्वीवर पडेल. ज्या दिवशी हा धूमकेतू पृथ्वीवर आदळेल तो या जगाचा शेवटचा दिवस असेल, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आलेला आहे. शाही यांच्या पुस्तकात जो उल्लेख करण्यात आलेला आहे, ती मुदत 2025 सालापर्यंत संपते. त्यामुळे आता लवकरच पृथ्वीवर धूमकेतू आदळणार आहे. त्यामुळे मोठा भूकंप होणार आहे, मोठ्या लाटा उसळणार आहेत, असा दावा शाही यांच्या अनुयायांकडून केला जात आहे. सोबतच या भूकंपामुळे शहरं उद्ध्वस्त होणार असल्याचेही या अनुयायांकडून सांगितले जातेय.
नासाचं नेमकं मत काय?
दरम्यान, आता या भविष्यवाणीनुसार खरंच पृथ्वीवीर धूमकेती आदळणार का? असा सवाल जगभरात विचारला जातोय. याचे उत्तर अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने दिले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही महिन्यात सध्यातरी कोणताही धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाही. सध्या 3I/ATLAS नावाचा धूमकेती पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आहे. पण त्याचा पृथ्वीला कोणताही धोका नाही.
