वडील देतात मुलांना कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या, कुठे सुरू आहे हा फालतू ट्रेंड?
एकेकाळी आई वडील काही गोष्टींबद्दल आपल्या मुलांसमोर चर्चा देखील करत नव्हते. मुले कितीही मोठी झाली किंवा त्यांचे लग्न झाले तरीही आई वडिल किंवा घरातील इतर वयस्कर लोक मुलांसमोर प्रेम वगैरे अशा गोष्टींवर चर्चा करणे टाळत. मात्र, आता काळ बदलला आहे.

एक काळ असा होता की, आई वडील काही गोष्टींबद्दल आपल्या मुलांसमोर चर्चा देखील करत नसत. मुले कितीही मोठी झाली किंवा त्यांचे लग्न झाले तरीही आई वडील किंवा घरातील इतर वयस्कर लोक मुलांसमोर प्रेम वगैरे अशा गोष्टींवर चर्चा करणे टाळत. हेच नाही तर घरात कोणी नातेवाईक आले तरीही पती पत्नी लाजून त्यांच्यासमोर जास्त बोलत देखील नसत. मात्र, काळ आता खूप जास्त बदलला. आपल्या मुलांना सगळ्या गोष्टींची समज असावी आणि त्यांच्यासोबत काही चुकीचे घडत असेल तर त्यांनी आपल्यासोबत संवाद साधावा, याकरिता आई वडील मुलांसोबत मनमोकळेपणाने प्रत्येक गोष्टीवर बोलत आहेत.
हेच नाही तर सध्या एक विचित्र आणि भारतीयांसाठी धक्कादायक असा ट्रेंड सध्या अमेरिकेत सुरू आहे. चक्क कॉलेजला जाणाऱ्या आपल्या मुलांच्या बॅगमध्ये पुस्तकांसह पालक हे चक्क गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम आणि औषधे टाकत आहेत. होय तुम्ही अगदी खरे वाचले. अमेरिकेत जवळपास सर्वच मुलांच्या कॉलेजच्या बॅगमध्ये यासर्व गोष्टी तुम्हाला अगदी सहजपणे मिळतील.
न्यू यॉर्क पोस्टमधील वृत्तानुसार, आता कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये पुस्तकांसोबतच कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या देखील टाकल्या जात आहेत. ही पालकांची बदललेली विचारसरणी म्हणावी लागणार आहे. ज्यामध्ये मुलांना केवळ अभ्यासासाठीच नव्हे तर जीवनातील कठीण परिस्थितींसाठी देखील तयार केले जात आहे. नार्कन, ज्याला अधिकृतपणे नालोक्सोन म्हणतात.
हे फेंटानिल सारख्या ओपिओइड औषधांचे परिणाम उलट करते आणि ओव्हरडोजच्या बाबतीत जीव वाचवू शकते. अमेरिकेत, फेंटानिल हे आता 18 ते 45 वयोगटातील प्रौढांसाठी मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 2023 मध्ये, 50,000 किशोरांनी या औषधाचा गैरवापर केल्याचे कबूल केले आणि 2022 ते 2023 दरम्यान त्याचा वापर 47 टक्के वाढला आहे. यामुळे आई वडिलांनी आपले विचार बदलून मुलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी स्वत:मध्ये हे बदल केल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच केसमध्ये आढळले की, तरुणांना हे देखील माहित नसते की, त्यांनी फेंटानिल घेतले आहे.
