लँडिंग करताना विमान डोंगराला आदळून नदीत कोसळलं, आगीचा भडका; 32 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले

यति एअरलाइन्सचं हे विमान होतं. काठमांडूवरून हे विमान पोखरा येथे जात होते. त्यावेळी विमान लँडिंग करताना जमिनीवर आदळलं. त्यामुळे अचानक विमानाने पेट घेतला.

लँडिंग करताना विमान डोंगराला आदळून नदीत कोसळलं, आगीचा भडका; 32 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले
passenger aircraft Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 12:34 PM

काठमांडू: नेपाळच्या पोखरा येथे विमान लँडिंग करताना जमिनीवर आदळलं. विमान लँडिंग करत असताना डोंगराला जाऊन आदळलं, त्यानंतर हे विमान सेती नदीत कोसळलं आणि विमानाने प्रचंड पेट घेतला. या दुर्घटनेत आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलं आहे. विमानातून 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर असे एकूण 72 प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेनंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. तसेच सर्व एजन्सींना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यति एअरलाइन्सचं हे विमान होतं. काठमांडूवरून हे विमान पोखरा येथे जात होते. त्यावेळी विमान लँडिंग करताना एका डोंगराला जाऊन आदळलं. त्यानंतर हे विमान सेती नदीत जाऊन कोसळलं. त्यामुळे अचानक विमानाने पेट घेतला. बघता बघता ही आग प्रचंड भडकली. या  अपघातात आतापर्यंत 32 प्रवासी दगावले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेपाळमधील जुनं विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं आहे. तसेच सर्व एजन्सींना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितलं आहे. बचाव कार्य करण्यासाठी नेपाळी सेनाही घटनास्थळी दाखल झाली आहे.

तसेच पोलीस, विमान प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनीही मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असल्याने तूर्तास एअरपोर्ट बंद करण्यात आलं आहे. तसेच या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हे विमान पोखराच्या जवळ पोहोचले होते. मात्र, डोंगराळ प्रदेशात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे ही विमान दुर्घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.