Live Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Jan 16, 2023 | 6:10 AM

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Live Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
Maharashtra Latest BreakingImage Credit source: tv9 marathi

मुंबई: राज्यभरात आज मकर संक्रातीचा उत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पुण्यातील खेडमधील पैलवान शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी ठरला. नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना शिवसेनेसह महाविकास आघाडीचा पाठिंबा. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक चुरशीची होणार. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jan 2023 02:29 PM (IST)

    एमपीएससीचे विद्यार्थी आज शरद पवारांची भेट घेणार

    एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात भेटीत होणार चर्चा

    शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आज संध्याकाळी 6 वाजता होणार भेट

    काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची माहिती

  • 15 Jan 2023 01:02 PM (IST)

    खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली

    अपघातानंतर धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या आठवड्यापासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

    आज खासदार संजय राऊत यांनी मुंडेंची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली

    या आधी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही मुंडे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती

  • 15 Jan 2023 12:13 PM (IST)

    महाराष्ट्र केसरीचा शरद पवारांकडून होणार गौरव

    महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे घेणार शरद पवार यांची भेट

    राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी शिवराज रक्षेला भेटायला बोलावलं

    आज सायंकाळी मोदी बागेत शिवराज घेणार शरद पवारांची भेट

  • 15 Jan 2023 11:23 AM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी लुटला पतंगबाजीचा आनंद

    ब्रह्मपुरी या त्यांच्या मतदारसंघात सध्या तीन दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सव सुरू आहे

    यानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

    त्याच दरम्यान वेळात वेळ काढून मकर संक्रांती निमित्त वडेट्टीवार यांनी सर्वांसोबत पतंगबाजीचा आनंद लुटत दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

    स्वतः वडेट्टीवार पतंगबाजीसाठी मैदानात उतरल्याचे बघून सर्वच कार्यकर्त्यांना जोश आला

    आबालवृद्धही वडेट्टीवारांसोबत पतंगबाजीचा आनंद लुटण्यासाठी मैदानात हजर झाले

  • 15 Jan 2023 08:48 AM (IST)

    मकर संक्रांतीला कापणार महागाईचा पतंग

    क्रूड ऑईलच्या किंमतीत जवळपास 8 टक्क्यांची वाढ

    कच्चे तेल महागल्याचा परिणाम दिसून येणार का

    पेट्रोल -डिझेलच्या किंमती जैसे थे, कोणताही बदल नाही

    प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता नवीन दर लागू होतात

  • 15 Jan 2023 08:20 AM (IST)

    पुणे शहर गारठलं, दोन दिवस महाराष्ट्राचा गारठाही वाढणार

    मागील आठवड्यात सातही दिवस पुणे शहराचा पारा 10 अंश सेल्सिअसच्याखाली

    पुढील दोन ते तीन दिवस थंडी वाढणार, पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज

    आजही पुण्याचे तापमान 10°c च्या खाली

    महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील थंडी वाढण्याची शक्यता

    पुढील दोन दिवस महाराष्ट्रात गारठा वाढणार, हवामान खात्याचा अंदाज

  • 15 Jan 2023 07:52 AM (IST)

    मॅरेथॉनला शिंदे-फडणवीस उपस्थित

    तब्बल दोन वर्षानंतर आज मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.

  • 15 Jan 2023 06:33 AM (IST)

    टाटा मुंबई मॅरेथॉनने आता वरळी सिलिंक क्रॉस केलंय

    जवळपास 55 हजार धावपटू हे सिलिंकवरून धावताना दिसत आहेत

    ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे

    तर जागोजागी अनेक स्वयंसेवकांकडून धावपटूंना पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय

  • 15 Jan 2023 06:16 AM (IST)

    नागपूरच्या इमामवाडा परिसरात अज्ञात आरोपींनी वाहनं फोडली

    घरासमोर असलेली वाहनं फोडून खाली पाडली

    इमामवाडा परिसरात दहशत

    पोलीस घटनास्थळी, अज्ञान आरोपींचा शोध सुरू

  • 15 Jan 2023 06:12 AM (IST)

    कापसाच्या बाजारपेठेत गेल्या दोन दिवसात क्विंटल मागे 400 रुपयाची घसरण

    शुक्रवारी 8050 च्या दराने कापूस खरेदी

    यंदाच्या हंगामात कापसाच्या बाजारात सारखी अस्थिरता दिसून येत आहे

    अगदी सोने-चांदीच्या बाजारपेठेपेक्षा पांढऱ्या सोन्याच्या दरात कमालीची अस्थिरता जाणवत आहे

    शेतकरी कापूस विक्री बाबत संभ्रमावस्थेत आहेत

    संक्रातीनंतर कापूस बाजार सावरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

  • 15 Jan 2023 06:08 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे व्हाट्सअपवर वादग्रस्त स्टेट्स, स्टेट्स ठेवल्याने दोन गटात वाद

    काही दुकानांची तोडफोड तर काही जणांमध्ये हाणामारी

    वादानंतर शिरपूर जैन कडकडीत बंद

    घटनेची माहिती कळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल

  • 15 Jan 2023 06:04 AM (IST)

    मुंबई मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून 21 किलोमीटर मॅरेथॉनला सुरुवात

    माहीमपासून या मरेथॉनला सुरूवात झाली आहे

    पहिली मॅरेथॉन 42 किलोमीटर असणार

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मुंबई मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात

Published On - Jan 15,2023 6:01 AM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.