महाविनाशापासून वाचण्याची तयारी, युके आणि युएसमध्ये लोक 25 वर्षे टीकणारे अन्नपदार्थ साठवत आहेत
एकीकडे जगाची वाटचाल अस्थिरतेकडे सुरु असून ब्रिटन आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशात लोक तिसऱ्या महायुद्ध वा आण्विक हल्ल्याशी लढण्याची तयारी करत आहेत.

जगातील सुरु असलेली युद्ध आणि तणावाची स्थिती पाहून अमेरिका आणि ब्रिटनमधील लोक स्वत:ची सुरक्षेपासून ते अंडरग्राऊंड बंकर सारख्या घरांवर खर्च करु लागले आहेत. डेली मेलच्या बातमीनुसार जगाच्या अंताची तयारी करीत असलेल्या ब्रिटीश लोकांच्या एका गटाने खुलासा केला आहे की लोक तिसऱ्या जागतिक युद्धाची तयारी कशी करीत आहेत याबाबत वृत्त दिले आहे.येथे लोक घराच्या आत बंकर तयार करत आहे. तसेच अनेक वर्षे टिकणाऱ्या डब्बाबंद जेवण आणि सेफ्टी उपकरणाची साठवणूक करीत आहे. यात २५ वर्षे टीकणारे मांसाचे पॅकबंद डब्बे लोक जमा करत आहेत.
कोण आहेत प्रीपर्स ?
महाविनाशाच्या दरम्यान वा नंतर जीवंत रहाण्यासाठी तयारी करणाऱ्या लोकांना प्रीयर्स म्हटले जाते. ब्रिटनमध्ये थर्ड वॉरच्या तयारी करणाऱ्या प्रीपर्सच्या सोशल मीडियावरील पेजेसवरुन कळते की यांच्या ग्रुपची तयारी मोठ्या प्रमाणावर तयार सुरु आहे.काही ग्रुपचे सदस्य २३,००० हून अधिक आहेत. जेव्हापासून रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तेव्हा ब्रिटनचे दुकान मालक जस्टीन जोन्स यांनी द गार्जियन सांगितले की दीड महिन्यातच त्यांनी एकाहून अधिक महिन्यांचा व्यवसाय केला होता. कारण घाबरलेले लोकांनी गॅस मास्क, आण्विक सुरक्षा सामग्री आणि पोटॅशियमची गोळ्यांसह जीवन संरक्षणाचे सामान खरेदी केले होते.
अखेर लोक का जमा करताहेत पोटॅशियम आयोडाईड गोळ्या
लोक पोटॅशियम आयोडाईड गोळ्या खरेदी करुन ठेवत आहेत. कारण अणुहल्ल्यासारख्या स्थितीत जीवंत राहण्यासाठी यास सहायक म्हटले जात आहे. जी आण्विक हल्ल्यात रेडीएशनला शोषित करुन थायरॉईड ग्रंथी वाचवतात. न्युयॉर्क पोस्टच्या एका बातमीनुसार मोंटानाच्या एक दाम्पत्याने वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की युद्ध, नैसर्गिक संकट वा खूप काळ वीज कपात झाल्याच्या स्थिती एक वर्षापर्यंत ऑफ-ग्रिड राहण्यासाठी पर्याप्त साहित्याची साठवणूक केली आहे.
महाविनाशानंतर गरजेच्या वस्तू
अमेरिकेत लोक महाविनाशानंतर जीवंत राहण्यासाठी ज्या वस्तूंची गरज आहे. त्यांना एकत्र करत आहेत. त्यात खाण्यापिण्याच्या वस्तूंसह अन्य मुलभूत वस्तूंचा समावेश आहे.याची एक यादीही जारी करण्यात आली आहे.
महाविनाशानंतर जीवंत राहाण्यासाठी 15 आवश्यक बंकर आयटम
• वॉटर फिल्टर आणि प्यूरिफिकेशन किट (पोर्टेबल फिल्टर, शुद्धीकरण टॅबलेट/थेंब)
• पर्याप्त वॉटर सप्लाय (प्रति व्यक्ती प्रति दिन किमान एक गॅलन)
• आपात्कालीन फूड स्टोअर (फ्रीझ-ड्राय भोजन, डब्बाबंद सामान, राशन)
• आग तयार करण्याचे उपाय (फेरो रॉड, वॉटरप्रूफ माचिस, लायटर, टिंडर)
• फर्स्ट एड किट (बेसिक औषधे, एंटीसेप्टिक, पट्ट्या)
• इमर्जन्सी शेल्टर (टार्प, हलका तम्बू, मायलर कंबल, बंकर)
• गरम कपडे आणि इन्सुलेशन (लोकरीचे मोजे, थर्मल, वॉटरप्रूफ पट्ट्या, हातमोजे)
• मल्टी-टूल या सर्व्हाव्हल चाकू (सर्वात जास्त लोक फिक्स्ड ब्लेड ठेवतात )
• लाईट सोर्स (हेडलँप + अतिरिक्त बॅटरी वा सौर ऊर्जेचे टॉर्च) • नेव्हीगेशन उपकरणं (कम्पास, मानचित्र, शक्य असेल तर जीपीएस बॅकअप)
• पोर्टेबल पॉवर सोर्स (सोलर चार्जर, सोलर पॅनल, पॉवर बँक, ट्राय-फ्यूल जनरेटर, सोलर जनरेटर) • कम्युनिकेशन टूल (आपात्कालीन रेडिओ, व्हिसल, बॅकअप फोन, सॅटेलाइट फोन)
• सेल्फ डिफेंस टूल (मिर्च स्प्रे, फायरआर्म्स, जेथे कायदेशीर असेल वा पर्यायी )
• हायजीन तसेच आरोग्यासंबंधी वस्तू (साबण, वाईप्स, टॉयलेट पेपर, गारबेज बॅग)
• महत्वपूर्ण डॉक्यूमेंट आणि रोख रक्कम (ओळख पत्र, रोख रक्कम, आपात्कालीन संपर्कांसहित वॉटरप्रूफ बॅग)
अमेरिकेत ५१ टक्के लोक तिसऱ्या महायुद्धासाठी तयार
अमेरिकेतील २ कोटीहून अधिक लोक तयारीला लागले आहेत आणि २०२३ च्या एका सर्व्हेक्षणाने समजले की देशातील ५१ टक्के लोक अणू हल्ला किंवा महाविनाशाची परिस्थितीशी लढण्यास तयार आहेत. डेली मेलच्या बातमीनुसार सर्व्हायवलिस्ट रिट्रीटचे एक निर्माता डु मिलर यांनी द न्यू यॉर्कर शी बोलताना सांगितले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला त्यानंतर त्यांच्याकडे सदस्यतेसाठी मागणी वाढली. कारण अमेरिकेतील लोकांना अशांततेची भीती वाटू लागली होती.
डेली मेल के अनुसार, सर्वाइवलिस्ट रिट्रीट के एक निर्माता, ड्रू मिलर ने द न्यू यॉर्कर को बताया कि राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प की हत्या के प्रयास के बाद , उनके पास सदस्यता के लिए अनुरोधों की बाढ़ आ गई थी. क्योंकि अमेरिकियों को नागरिक अशांति का डर बढ़ रहा था.
प्रमुख हस्तीं देखील बनवतायत बंकर
महाविनाशाच्या तयारीसाठी सामान्य लोकच सज्ज आहेत असे नाही. तर प्रसिद्ध हस्तींसाठी देखील हे एक स्टेटस सिंबल बनले आहे. मार्क झुकरबर्ग, किम कार्दशियन आणि पोस्ट मेलोन यांनी देखील महाविनाशानंतर वाचण्यासाठी पैसा खर्च केलेला आहे.
