AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा, ‘या’ मुद्द्यावर भारत-अमेरिकेचे एकमत

इस्रायल सतत गाझा पट्टीत हल्ले करत होते, त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

PM मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा, 'या' मुद्द्यावर भारत-अमेरिकेचे एकमत
Trump and Modi
| Updated on: Sep 30, 2025 | 6:49 PM
Share

इस्रायल सतत गाझा पट्टीत हल्ले करत होते, त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात याबाबत बैठक झाली आहे. या नंतर ट्रम्प यांनी 72 तासांच्या आत ओलिसांची सुटका करण्याचे आवाहन करणारी एक शांतता योजना जाहीर केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या योजनेला भारतासह अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. मात्र हमासने ही योजना स्वीकारली की नाही हे अद्याप समोर आलेले नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांची शांतता योजना काय आहे?

भारतासह जगभरातील देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आता ट्रम्प यांनी इस्रायल-हमास युद्ध संपवण्यासाठी 20 कलमी योजना सादर केली आहे. या योजनेनुसार ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली एक तात्पुरती प्रशासकीय मंडळ स्थापन केले जाणार आहे. यात माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश असेल. ही योजना इस्रायल आणि हमासने स्वीकारली तर युद्ध ताबडतोब संपेल. तसेच इस्रायलला 72 तासांच्या आत ओलिसांची सुटका करावी लागेल. मात्र हमासने ही योजना स्वीकारली नाही तर त्यांचा पराभव करण्यासाठी अमेरिका इस्रायलला पाठिंबा देणार आहे.

भारतासह या देशांचा शांतता योजनेला पाठिंबा

भारताने ट्रम्प यांच्या या योजनेला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या या योजनेचे स्वागत केले. पंतप्रधान म्हणाले की, “सर्व संबंधित पक्ष ट्रम्प यांच्या पुढाकारामागे एकत्र येतील आणि संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता सुनिश्चित करण्यासाठीच्या या प्रयत्नांना पाठिंबा देतील.”

जॉर्डन, कतार, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया आणि इजिप्त या देशांनीही ट्रम्प यांच्या या शांतता योजनेचे स्वागत केले आहे. तसेच फ्रान्स, इटली, ब्रिटन, जर्मनी आणि युरोपियन कौन्सिलनेही ट्रम्प यांच्या योजनेला पाठिंबा दिला आहे. या सर्व देशांनी हे युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान या युद्धात आतापर्यंत 66 हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात 1,68,162 पॅलेस्टिनी जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.