AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi-Donald Trump : ‘बांग्लादेशच काय करायचं ते…’, PM मोदींसोबत बैठकीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा

PM Modi-Donald Trump : पीएम मोदी यांना रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीसंबंधी भारताच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मोदी म्हणाले की, "ट्रम्प यांनी युद्ध समाप्तीसाठी जो पुढाकार घेतलाय, त्याचं समर्थन करतो. युद्ध सुरु असताना जगाला असं वाटत होतं की, भारत निष्पक्ष आहे, पण मी तुम्हाला सांगतो, भारत निष्पक्ष नव्हता, भारताची भूमिका शांततेची होती"

PM Modi-Donald Trump : 'बांग्लादेशच काय करायचं ते...', PM मोदींसोबत बैठकीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा
PM Modi-Donald Trump
| Updated on: Feb 14, 2025 | 7:54 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी भेट झाली. दोघांच्या बैठकीत बांग्लादेशच्या मुद्यावर सुद्धा चर्चा झाली. त्यावेळी बांग्लादेशातील संकटासंबंधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, बांग्लादेशचा निर्णय मोदी घेतील. बांग्लादेश बाबत काय करायचं ते मोदी ठरवतील असं ट्रम्प स्पष्टपणे म्हणाले. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वॉशिंग्टन येथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत व्यापार आणि भारत-अमेरिका संबंधांवर चर्चा झाली. सध्या रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत. यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका महत्त्वाची आहे. दोन्ही नेते पत्रकार परिषदेला संबोधित करत होते, त्यावेळी ट्रम्प यांना रशिया-युक्रेन युद्धाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तसच बांग्लादेशातील संकटाबद्दलही विचारलं. त्यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की,

“बांग्लादेशातील संकटात अमेरिकेचा सहभाग नाहीय. बांग्लादेशचा मुद्दा कसा सोडवायचा ते मी पीएम मोदींवर सोडतो” बांग्लादेशातील संकटाला विद्यार्थी आंदोलनाने सुरुवात झाली. पुढे जाऊन हे आंदोलन इतकं उग्र झालं की, त्या देशात सत्तापालट झाला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांग्लादेश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. सध्या बांग्लादेशात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. अल्पसंख्यांक खासकरुन हिंदुंवर तिथे हल्ले सुरु आहेत. बांग्लादेशकडून शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी करण्यात येत आहे.

कुठे सर्वात जास्त हल्ले झाले?

बांग्लादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळताच तिथे राहणाऱ्या अल्पसंख्यांक हिंदुंवर हल्ले सुरु झाल्याच्या बातम्या आल्या. त्यांची घरं-दुकानं जाळण्यात आली. ठाकुरगांव, लालमोनिरहाट, दिनाजपुर, सिलहट, खुलना आणि रंगपुर या ठिकाणी जास्त हल्ले झाले. सध्या तिथे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं आहे.

बैठकीत काय चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गुरुवारी ओवल ऑफिसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी व्यापारी संबंधांसह अवैध प्रवासी आणि अन्य मुद्यांवर चर्चा केली. पीएम मोदी आपले मित्र असल्याचे ट्रम्प म्हणाले. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.