AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंद म्हणजे प्रगती मानणारा ‘हा’ देश आता भारताला मानतो मोठा भाऊ

हा देश GDP वर नाही, तर GNH वर ठरवतो. हॅप्पीनेस इंडेक्समध्ये हा देश भारत तसच अनेक देशांपेक्षा पुढे आहे. जवळपास 8 लाख लोकसंख्येचा हा देश जंगल, डोंगर आणि निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे.

आनंद म्हणजे प्रगती मानणारा 'हा' देश आता भारताला मानतो मोठा भाऊ
PM Modi
| Updated on: Mar 22, 2024 | 1:56 PM
Share

पीएम नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर आहेत. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांनी पंतप्रधान मोदींची गळाभेट घेऊन त्यांचं जोरदार स्वागत केलं. पीएम मोदी 23 मार्च पर्यंत भूतानच्या दौऱ्यावर असतील. द्विपक्षीय आणि क्षेत्रीय मुद्यांवर या मध्ये चर्चा होईल. भूतान आणि भारताचे संबंध नेहमीच चांगेल राहिले आहेत. पंतप्रधान मोदी या संबंधांना आणखी दृढ बनवू शकतात. भूतान एक छोटा देश आहे. मात्र, तरीही या देशाने आपल वेगळेपण जपलेलं आहे. भूतान आपली प्रगती GDP वर नाही, तर GNH वर ठरवतो. हॅप्पीनेस इंडेक्समध्ये भूतान भारत तसच अनेक देशांपेक्षा पुढे आहे.

GDP मध्ये मागे असूनही अनेक भूतानी नागरिक आपल्या आयुष्यात आनंदी आहेत. भूतानची निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेती आणि हायड्रोपावरशी संबंधित आहे. जवळपास 8 लाख लोकसंख्येचा हा देश जंगल, डोंगर आणि निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. त्यामुळे या देशाचा कमाईचा बराचसा भाग पर्यटनामधून येतो. कमाईपेक्षा भूतानच सरकार संस्कृती आणि पर्यावरणावर प्रेम करते. त्यामुळेच इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादीत आहे. एकवेळ तर भूतानमध्ये बाहेरच्या लोकांवर बंदी होती. 1970 मध्ये भूतानने परदेशी लोकांना आपल्या इथे येण्यास परवानगी दिली.

या देशात TV कधी सुरु झाले?

वर्ष 1999 पर्यंत भूतानमध्ये सॅटलाइट टीवी, इंटरनेट आणि टेलिविजन स्टेशन सुरु झालेलं नव्हतं. 1989 साली भूतानच्या सरकारने देशाची संस्कृती वाचवण्याच्या नावाखाली या सगळ्यावर बंदी घातली होती. भूतानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 1990 मध्ये वॉशिंग्टन पोस्टला एक मुलाखत दिलेली. आम्ही आमच्या देशाला ना मॉर्डनाइज ना वेस्टर्नाइज करण्याचा प्रयत्न करतोय. 1990 च्या दशकात भूतानच्या लोकांसाठी रेडिओ हे बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याच एकमेव माध्यम होतं. पण वेळेनुसार, भूतानने आपल्या नीतीमध्ये बदल केला. 1999 मध्ये भूतानचे राजे जिग्मे दोर्जे वांगचुक यांनी सायबर युग सुरु होत असल्याच सांगत TV ला हिरवा झेंडा दाखवला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.