मोठी बातमी! अमेरिकेत सर्वात मोठी घडामोड, ट्रम्प यांना जबर धक्का, आता पुढे काय होणार?
डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या काही निर्णयांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, तसेच ते जगभरात चर्चेचा विषय देखील ठरले आहेत, मात्र याच निर्णयामुळे ते आता अडचणीत सापडले असून, त्यांना मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. सुरुवातीला त्यांनी अनेक देशांविरोधात टॅरिफ अस्त्राचा वापर केला, यामुळे काही देशांना मोठा फटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर देखील 50 टक्के टॅरिफ लावा, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून आपण भारतावर टॅरिफ लावल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं, तसेच त्यांनी युरोपीयन संघावर देखील भारतावर टॅरिफ लावावा यासाठी दबाव टाकला होता. त्यामुळे आता भारत आणि अमेरिकेमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत.
दरम्यान यानंतर त्यांची आता शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी धडपड सुरू आहे. त्यांनी सुरुवातीला रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा हा इस्रायल आणि गाझाच्या युद्धाकडे वळवला आहे. हमास आणि इस्रायलमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत, आपण भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवलं होतं, असा दावा देखील त्यांनी काही दिवसांपू्र्वी केला होता, मात्र भारताकडून त्यांचा हा दावा फेटाळण्यात आला आहे.
मात्र हे सर्व सुरू असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतच मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होऊ शकतात आणि त्यामध्ये आपल्या पक्षाचा पराभव होऊ शकतो अशी भीती आता ट्रम्प यांना वाटत आहे. 2026 मध्ये मध्यावधी निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला खराब कामगिरीचा फटका बसू शकतो, निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीला धक्का बसू शकतो अशी शंका ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेमध्ये सध्या शटडाऊनची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे ट्रम्प सरकारवरील दबाव आता आणखी वाढला आहे. तसेच अमेरिकेच्या विविध माध्यमातून जे सर्व्हे समोर आले आहेत, त्या सर्व्हेमध्ये देखील असा दावा करण्यात आला आहे की, ट्रम्प यांची लोकप्रियता त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात झपाट्यानं कमी झाली आहे, त्यामुळे आता ट्रम्प यांची चिंता वाढली आहे, 2026 मध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असं बोललं जात आहे, त्यामुळे आता अमेरिकेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
