AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींचे यूएईमध्ये भव्य स्वागत, पहिल्या हिंदू मंदिराचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या यूएई आणि कतार दौऱ्यासाठी आज रवाना झाले. अबुधाबी मध्ये ते पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते भारतीय समुदायाच्या लोकांना देखील संबोधित करणार आहेत. यानंतर मोदी हे कतार दौऱ्यावर जाणार आहेत. ही भेट देखील विशेष असणार आहे.

पंतप्रधान मोदींचे यूएईमध्ये भव्य स्वागत, पहिल्या हिंदू मंदिराचे करणार उद्घाटन
| Updated on: Feb 13, 2024 | 6:18 PM
Share

PM modi in UAE : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय UAE दौऱ्यासाठी अबुधाबीला पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी अबुधाबीमध्ये बांधलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीहून संयुक्त अरब अमिराती आणि कतारच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले. ते UAE सोबत द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच, दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारीला ते हिंदू धर्माचे केंद्र असलेल्या अबू धाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील.

मोदींचा सातवा यूएई दौरा

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी त्यांच्या UAE दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात UAE च्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. भारतीय समुदायातील लोकांनाही संबोधित करणार आहेत. यादरम्यान ते अबुधाबीमध्ये BAPS द्वारे बांधण्यात आलेल्या भव्य हिंदू मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमाला अहलान मोदी असे नाव देण्यात आले आहे.

UAE मध्ये PM मोदी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. 9 जानेवारी रोजी ‘व्हायब्रंट गुजरात 2024’ दरम्यान गुजरातमध्ये त्यांची भेट झाली. उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांचीही ते भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले की, “माझे भाऊ मोहम्मद बिन झायेद यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. पुढील दोन दिवसांत, या देशांसोबत भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मी UAE आणि कतारला भेट देईन.

अनेक गोष्टींवर चर्चा

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी आणि UAE चे अध्यक्ष ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा व्यापार, बंदरे, रेल्वे आणि सागरी लॉजिस्टिक, डिजिटल पायाभूत सुविधा, भांडवल प्रवाह आणि यासह विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करतील अशी अपेक्षा आहे. 2015 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर यूएईची ही त्यांची सातवी भेट असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेण्याव्यतिरिक्त, PM मोदी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 ला देखील उपस्थित राहतील, जिथे ते एक विशेष मुख्य भाषण देतील.

भारतीय लोकांना करणार संबोधित

पंतप्रधान झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियमवर अबुधाबीमधील भारतीय लोकांना संबोधित करतील. अबुधाबीमध्ये भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या ‘अहलान मोदी’ कार्यक्रमाने अभूतपूर्व लक्ष वेधून घेतले आहे. 65,000 हून अधिक नोंदणी झाली आहे.

UAE नंतर PM मोदी कतारला जाणार

पीएम मोदी 13-14 फेब्रुवारीपर्यंत UAE मध्ये राहणार असून त्यानंतर ते दोहाला जाणार आहेत. कतारची ही भेट खास असणार आहे. कारण कतारने कालच आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.