जग संकटात! रशियाने अमेरिकेसोबतचा तो मोठा करार केला रद्द, पुतिन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला झटका
युक्रेन आणि रशियाचे युद्ध पेटले असून याची झळ अनेक देशांना बसतंय. या युद्धात अमेरिकेने उडी घेतली असून थेट रशियाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. आता पुतिन यांनी सर्वात मोठा झटका अमेरिकेला दिलाय.

युक्रेन आणि रशियाच्या युद्धाची झळ पूर्ण जगाला बसतंय. रशियाने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, आम्ही फक्त एकट्या युक्रेनसोबत नाही तर संपूर्ण नाटो देशांविरोधात युद्ध लढत आहोत. युक्रेनला अप्रत्यक्षपणे अमेरिकेसोबतच नाटो देशांचा पाठिंबा असल्याचा आरोप आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने हे युद्ध अधिक काळ सुरू असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेने केला. भारताने रशियासोबत व्यापार करू नये आणि कच्च्या तेलाची निर्यात पूर्णपणे बंद करावी, याकरिता अमेरिका भारतावर दबाव टाकण्याचे काम करत आहे. मात्र, त्यानंतरही भारताने रशियासोबत काही महत्वाचे करार करत तेल खरेदी सुरूच ठेवली. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. रशियाला अमेरिकेकडून सतत धमाकावले जातंय.
अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेनंतर रशियाने देखील अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका दिला आहे. सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेसोबतचा प्लुटोनियम करार रद्द करून अमेरिकेला धक्का दिला, ज्याचा अर्थ दोन्ही बाजू अण्वस्त्रे विकसित करणार नाहीत. मात्र, अमेरिका वेगवेगळ्या पद्धतीने रशियाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतानाच हा करार थेट रशियाने रद्द करण्याचा निर्णय घेतला.
एएनआयच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पुतिन यांनी ही थेट कारवाई केली. पुतिन यांनी स्वाक्षरी केलेल्या कायद्याला या महिन्यातच रशियन संसदेने मान्यता दिली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून युक्रेनची बाजू जाहिरपणे घेताना अमेरिका दिसली. हेच नाही तर रशियाची अर्थव्यवस्था डबघाईला आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत असून रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी अनेक देशांवर दबाव टाकत आहेत.
पुतिन यांनी अण्वस्त्रधारी शक्तींना आता सतर्क केले आहे. सप्टेंबर 2000 मध्ये रशिया आणि अमेरिकेमध्ये एक विशेष करार करण्यात आला होता. ज्यामध्ये दोन्ही देशांना 34 टन शस्त्रे वापरण्यासाठी प्लुटोनियम नष्ट करणे आवश्यक होते. मात्र, मॉस्कोने ऑक्टोबर 2016 मध्ये हा करार रद्द केला. अमेरिकेने रशियाच्या या कृतीला स्वतःविरुद्ध मानले होते. मुळात म्हणजे रशियाने काही दिवसांपूर्वीच अत्यंत घातक असलेल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बुरेव्हेस्टनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्यानंतर पुतिन यांनी अमेरिकेसोबतचा करार रद्द केला आहे.
