अंगावर काटा आणणारा पुतिन यांचा ‘तो’ तुरुंग, येथे येण्या ऐवजी कैदी रक्ताची नस कापू घेतात

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) हे आपल्या विरोधकांना कसं हाताळतात याविषयी सध्या जगभरात चर्चा सुरु आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:25 PM, 1 Mar 2021
अंगावर काटा आणणारा पुतिन यांचा 'तो' तुरुंग, येथे येण्या ऐवजी कैदी रक्ताची नस कापू घेतात

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) हे आपल्या विरोधकांना कसं हाताळतात याविषयी सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. रशियाच्या विरोधी पक्षाचे नेते एलेक्सी नावलनी (Alexei Navalny) यांना अटक आणि तुरुंगवासाच्या शिक्षेवरुन जगभरातून पुतिन यांच्यावर टीका होतेय. त्यातच आता पुतिन यांनी त्यांचे विरोधक असलेल्या एलेक्सी नावलनी यांना पुतिन यांनी रशियाच्या कुप्रसिद्ध असलेल्या तुरुंगात डांबलंय. Penal Colony Number-2 IK-2 असं या तुरुंगाचं नाव आहे. या ठिकाणी जाणं टळावं आणि तेथील छळ सहन करावा लागू नये म्हणून अनेक कैदी स्वतःची रक्ताची नस कापून घेत असल्याचीही उदाहरणं सांगितली जातात (Russia President Vladimir Putin send opposition leader Alexei Navalny to Penal Colony Number-2 IK-2 jail).

रशियाचा हा तुरुंग सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. रशियातील कैदी तर या तुरुंगाच्या नावानेच घाबरतात. या तुरुंगात जावं लागू नये अशीच येथील कैद्यांची इच्छा असते. या तुरुंगात शिक्षा भोगून आलेले कैदी त्यांचे तुरुंगवासातील अनेक भयानक अनुभव सांगतात. अशाच एका माजी कैद्याने या तुरुंगाविषयी बोलताना सांगितले की अनेक कैदी आपल्याला या तुरुंगात जावं लागू नये म्हणून अगदी स्वतःच्या जीवाला धोका पोहचवत रक्ताची नस कापून घेतात किंवा पोटात चाकू खुपसतात आणि रुग्णालयात दाखल होतात.

रशियाच्या विरोधी पक्षाचे नेते नावलनी यांना अटक का?

एलेक्सी नावलनी यांनी पुतिन यांच्यावर एका नर्व एजन्टच्या माध्यमातून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. त्यानंतर त्यांना जर्मनीत जवळपास 5 महिने उपचार घ्यावा लागला. ते रशियात परतल्यानंतर त्यांनी पुतिन यांच्याविरोधात पुन्हा एकदा मोर्चा खोलला. यानंतर त्यांच्यावर पुतिन सरकारने कोर्टाने दिलेल्या पॅरोलच्या अटींचा भंग केल्याचा आरोप केला. यावरुनच त्यांना तुरुंगावासाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. मात्र, नावलनी यांनी याला पुतिन यांचा राजकीय बदला असल्याचा आरोप केलाय. विशेष म्हणजे आधी नावलनी यांना कोठे ठेवण्यात आलं होतं याविषयी कुणालाच माहिती नव्हती. त्यामुळे जगभरातून काळजी व्यक्त करण्यात आली. अखेर नावलनी यांना मॉस्कोपासून 100 किलोमीटर अंतरावरील रशियाच्या कुख्यात तुरुंगात ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.

रशियाच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला तुरुंगाचा छळ सहन करावा लागणार

44 वर्षीय नावलनी यांना रशियाच्या पोकरोव शहरातील कुख्यात पेनल कॉलोनी नंबर-2 या तुरुंगात ठेवण्यात आलंय. या तुरुंगाला IK-2 या नावानेही ओळखले जाते. या तुरुंगात नावलनी यांना अडीच वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. IK-2 मध्ये राहिलेल्या एका माजी कैद्याने सांगितलं की या तुरुंगात फक्त राहणं ही देखील मोठी शिक्षा आहे. फक्त राहिलं तरी इथं भयंकर छळ होतो. मानवाधिकार कार्यकर्ते रुसलान वाखापोव यांनी वृत्तसंस्था तास एजन्सीला याबाबत माहिती देताना सांगितलं की नावलनी यांना काही झाल्यास या तुरुंगात त्यांना वकिलाचीही मदत मिळणार नाहीये.

हेही वाचा :

पुतीन यांची सर्वात मोठी चाल, खून, चोरी किंवा षडयंत्र, काहीही केलं तरी आजन्म संरक्षण

व्‍लादीमिर पुतिनचा 100 अब्ज डॉलरचा रहस्‍यमय बंगला, फोटो व्हायरल करणाऱ्याच्या जीवाला धोका का?

Special Story : रशियावर मागील 20 वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व, व्लादिमीर पुतिन यांच्या सत्तेचं रहस्य काय?

 व्हिडीओ पाहा :

Russia President Vladimir Putin send opposition leader Alexei Navalny to Penal Colony Number-2 IK-2 jail