व्‍लादीमिर पुतिनचा 100 अब्ज डॉलरचा रहस्‍यमय बंगला, फोटो व्हायरल करणाऱ्याच्या जीवाला धोका का?

व्‍लादीमिर पुतिनचा 100 अब्ज डॉलरचा रहस्‍यमय बंगला, फोटो व्हायरल करणाऱ्याच्या जीवाला धोका का?

रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्‍लादीमिर पुतिन हे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते आपल्या 100 अब्ज डॉलर किमतीच्या रहस्यमय बंगल्यामुळे चर्चेत आलेत.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 22, 2021 | 9:03 PM

मॉस्कोव : रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्‍लादीमिर पुतिन हे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते आपल्या 100 अब्ज डॉलर किमतीच्या रहस्यमय बंगल्यामुळे चर्चेत आलेत. रशियातील विरोधी पक्षांचा प्रमुख चेहरा असलेल्या एलेक्‍सेई नवैलिनी यांनी या बंगल्याविषयी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. विशेष म्हणजे नवैलिनी यांनी काही दिवसांपूर्वीच पुतिन यांच्यावर त्यांना विष देऊन मारण्याचा आरोप केला होता. ते नुकतेच रशियात परतले, मात्र त्यांनी पुतिन यांच्या बंगल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याने त्यांना अटक झालीय (Vladimir Putins critic Alexei Navalny claims Russian President has a secret billion dollar palace).

नवैलिनी यांनी पुतिन यांच्या गुप्त बंगल्याची माहिती देताना म्हटलं, “पुतिन आगामी काळात अब्जावधी डॉलरच्या गुप्त बंगल्यात राहायला जाणार आहेत. या ठिकाणी एक स्ट्रिप क्‍लब, एक कसिनो आणि थिएटरशिवाय अनेक चैनीच्या सुविधा असलेल्या खोल्या आहेत. या गुप्त बंगल्याची किंमत एक बिलियन डॉलर आहे.”

यू-ट्यूबवर पुतिन यांच्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, नवैलिनी यांच्याकडे पुतिन यांच्या या गुप्त बंगल्याची संपूर्ण माहिती आहे. हा बंगला रशियाच्या दक्षिण भागातील काळ्या समुद्रावर बांधला जात आहे. या बंगल्याचे काही थ्री डी फोटो समोर आलेत. यानुसार पुतिन यांच्या बंगल्यात एक आर्केट रूम आहे. यात स्‍लॉट मशीन आणि डान्ससाठीच्या खास जागेसोबतच स्‍पा आणि एक थिएटर देखील आहे. याशिवाय येथे एक अंडरग्राऊंड बर्फाचं मैदान देखील आहे. इतकंच नाही तर पुतिन यांच्यासाठी खास द्राक्षांचा बागही तयार करण्यात आलाय.

नवैलिनी यांनी पुतिन यांच्या बंगल्याचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत. यू-ट्यूबवर त्यांनी 2 तासाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. यानंतर लगेचच नवैलिनी यांना अटक झाली. नवैलिनी यांचा हा व्हिडीओ पोस्‍ट झाल्यानंतर 2 तासातच त्याला 3 मिलियन लोकांनी पाहिलंय.

गुप्त बंगल्याच्या परिसरात नो फ्लाय झोन आणि चेकपॉईंटची सुविधा

नवैलिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांच्या या गुप्त बंगल्याची कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. येथे त्यांचं स्वतःचं एक बंदरही आहे. याशिवाय एक चर्च, स्वतःची परमिट व्यवस्था, एक नो-फ्लाय झोन आणि चेकपॉईंट देखील आहेत. हा केवळ एक बंगला नसून एक स्वतंत्र राज्य किंवा देश असल्याचंही बोललं जातंय.

पुतिन यांना नुकतीच आतापर्यंतची सर्वात मोठी लाच मिळाल्याचाही आरोप होतोय. याच लाचेच्या पैशातून पुतिन स्वतःच्या मालकीचा हा गुप्त बंगला बांधत असल्याची चर्चा आहे. नवैलिनी यांच्याकडील बंगल्याची माहिती, फोटो आणि व्हिडीओ त्यांना या बंगल्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांपैकी एकाकडून मिळाले आहेत, असंही ते म्हणाले. पुतिन या बंगल्यात आपली गर्लफ्रेंड माजी जिमनास्‍ट एलिना काबाकोवासोबत राहणार आहेत.

हेही वाचा :

रशियाकडून 9 लाख कोटी रुपयांचं सोने खरेदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची नवी चाल काय?

असं काय घडतंय की, मित्र असलेल्या रशियाची पाकिस्तानशी जवळीक वाढतेय?

पुतीन यांची सर्वात मोठी चाल, खून, चोरी किंवा षडयंत्र, काहीही केलं तरी आजन्म संरक्षण

व्हिडीओ पाहा :

Vladimir Putins critic Alexei Navalny claims Russian President has a secret billion dollar palace

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें