Special Story : रशियावर मागील 20 वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व, व्लादिमीर पुतिन यांच्या सत्तेचं रहस्य काय?

रशियाला अमेरिकेच्या स्पर्धेत आणून उभं केलं. त्यामुळेच पुतिन यांच्या या यशामागील रहस्य काय असा प्रश्न अनेकजण विचारतात. त्याचाच हा खास आढावा.

Special Story : रशियावर मागील 20 वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व, व्लादिमीर पुतिन यांच्या सत्तेचं रहस्य काय?
ब्लादिमीर पुतीन
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 30, 2021 | 8:06 AM

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल जगभरात अनेक गूढकथा आहेत. त्यांच्या विषयीच्या अनेक भाकडकथाही तयार झाल्यात. यामागे एक कारण मागील अनेक वर्षांपासून त्यांची रशियावरील एकहाती पकड हे आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ते अमेरिकेला आव्हान देणाऱ्या जगातील मोजक्या देशांपैकी एका देशाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळेच त्यांच्याविषयी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांमध्ये अनेक गोष्टी पसरवण्यात आल्यात. तरीही त्यांची रशियाच्या सत्तेवरील पकड तितकीच मजबूत आहे. पुतिन यांनी एकिकडे अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान तर दिलंच, सोबत रशियाला अमेरिकेच्या स्पर्धेत आणून उभं केलं. त्यामुळेच पुतिन यांच्या या यशामागील रहस्य काय असा प्रश्न अनेकजण विचारतात. त्याचाच हा खास आढावा (Special Story on Russia President Vladimir Putin and his secret of political success how he works).

व्लादिमीर पुतिन हे एका मजुराचा मुलगा आहेत. त्यांनी लहानपणापासूनच जासूस होण्याचं स्वप्न पाहिलं आणि एकदा तर थेट रशियाच्या गुप्तचर विभागात जाऊन हे होण्यासाठी काय करावं लागेल असा थेट सवाल विचारला. पुढे पुतिन यांनी कायद्याचं शिक्षण घेऊन रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीत काम सुरु केलं. अनेक वर्षे हे काम केल्यानंतर त्यांनी सोव्हिएत रशियाचं पतन झाल्यानंतर केबीजीतून राजीनामा देऊन थेट राजकारणात उडी घेतली. विशेष म्हणजे या काळात रशियाची आर्थिक स्थिती ढासाळलेली होती. यालाच पुतिन यांनी संधीत रुपांतरीत केलं आणि ते रशियाचे पंतप्रधान बनले. यानंतर त्यांच्या राजकीय यशाचा आलेख उंचावतच गेला.

‘प्रतिमा उभी करण्यासाठी सुनियोजित राबवलेल्या प्रचारतंत्राचा मोठा वाटा’

पुतिन यांनी रशियाला आर्थिक स्थैर्य दिलं, रशियातील उद्योगांना चालना दिली आणि प्रशासनावरील आपली पकड मजबूत केली. त्यांची सध्याची प्रतिमा तयार होण्यामागे त्यांनी आपली प्रतिमा उभी करण्यासाठी सुनियोजित राबवलेल्या प्रचारतंत्राचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. मात्र, दुसरी बाजू रशियातील लोकांना पुतिन यांची भावणारी कामाची पद्धत हेही आहे. पुतिन यांनी देशातील सामान्य कामगारांच्या हक्कांवर ठरवून भर दिला. याचाच एक किस्सा आहे. यानुसार, 11 वर्षांपूर्वी 4 जूनला पुतिन यांनी कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली असताना आणि मालकांकडून त्यांचं शोषण होत असताना घेतलेली खमकी भूमिका. रशियातील अनेक कंपनी मालकांनी कामगारांचे वेतन थकवले. इतकेच नाही तर कडाक्याच्या थंडीत कामगारांना गरम पाणी आणि इतर मुलभूत सुविधाही नाकारल्या गेल्या. याविरोधात 2009 मध्ये रशियातील पिकालयोवोच्या मोनोटाऊन भागात प्रचंड असंतोष होता.

‘कामगारांच्या प्रश्नावर उद्योगपतींना शिंगावर घेतलं’

या भागातील जवळपास सर्व कंपन्यांचं कामकाज थांबलं होतं कारण मालकांकडून कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप झाला होता. याबाबत पुतिन यांना माहिती समजली. त्यावेळी पुतिन लेनिनग्रॅड फेडरेशन या कामगारांच्या संघटनेचे प्रमुख होते. त्यावेळी एका स्थानिक कामगार संघटनेच्या नेत्याने पुतिन यांना पत्र लिहिलं. यात नमूद केलेल्या कामगारांच्या अडचणी वाचून पुतिन यांनी स्वतः या कामगारांच्या भेटी घेतल्या. विशेष म्हणजे यावेळी पुतिन यांनी आपल्यासोबत या कंपन्यांच्या मालकांनाही आणलं.

त्यावेळी पुतिन म्हणाले, “काम बंद राहून कंपन्या रिकाम्या दिसाव्यात असं मला वाटत नाही. हे काही चांगलं चित्र नाही. हे कुणामुळे झालंय याची मला माहिती हवी आहे. हे ज्यांच्यामुळे झालंय त्यांनी हे चित्र स्वतःच्या डोळ्यांनी पहावं असं मला वाटतंय. लोकांशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की काही लोकांनी हजारो लोकांना आपल्या महत्त्वकांक्षेपायी, हव्यासासाठी वेठीस धरलं आहे. यात अत्यंत बेजबाबदार व्यावसायिक वर्तनाचाही समावेश आहे. हे अजिबात मान्य केलं जाणार नाही. उद्योगांची सामाजिक जबाबदारी काय आहे? ते केवळ कामगारांचं शोषण करत आहोत. स्थानिक सरकारी संस्था लोकांची मदत करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत हे कुणीही सांगू शकत नाही.”

“मी जेव्हा इथं येण्याविषयी बोललो तेव्हा मला इथं येऊ नका, आम्ही सर्व व्यवस्थित पाहतो असं सांगण्यात आलं. मग मी इथं येईपर्यंत येऊपर्यंत या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी एकही माणूस का नाही. तुम्ही प्रक्रियांचं पालन केलं नाही. मालकांनी सहकार्य वाढवण्याऐवजी हेवेदावे, भांडणं सुरु केली. यामुळे एकमेकांना कच्चा माल पुरवणं बंद झालंय. यामुळे मुलभूत पायाभूत सुविधाही उद्ध्वस्त झाल्या,” असंही पुतिन यांनी नमूद केलं.

‘कारखाने बंद करणारे मालक पुतिन यांच्या फैलावर’

पुतिन यांचा या बैठीकीत कंपनी मालकांना फैलावर घेतानाचा हा व्हिडीओ रशियात त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला. या बैठकीनंतर सुरुवातीला कामगारांना दिलासा देण्यास आढेवेढे घेणारे धनाढ्य कंपनी मालकांनी तत्काळ कामगारांना दिलासा देण्याची तयारी दाखवली. इतकंच नाही तर त्याबाबतच्या लेखी करारावर स्वाक्षरीही केल्या. यानंतर पुतिन यांनी सर्व कंपनी मालकांना तात्काळ कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देण्यास सांगितले. यासाठी त्यांनी केवळ एक दिवसाची मुदत दिली. तसेच उद्योगपतींकडे आपले प्रकल्प सुरु करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं. तसेच जर तुम्ही याच्याशी सहमत झाला नाही, तर आम्ही तुमच्याशिवाय हे प्रकल्प सुरु करु, अशा इशाराही दिला.

अशाप्रकारे पुतिन यांनी शेकडो निर्णय घेतले ज्यामुळे पुतिन रशियात हिरो ठरले आणि त्यामुळे त्यांची रशियावरील पकड वाढत गेली. त्यांना रशियात कुणाचं आव्हान मिळालं नाही असंही नाही. रशियावरील आपली पकड मजबूत केलेल्या माजी गुप्तहेर पुतिन यांनी आपल्या विरोधकांना संपवण्याचीही व्यवस्था केलेली असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होतो. याचंच एक उदाहरण म्हणजे त्यांच्यावर नुकताच रशियाच्या विरोधी पक्षाचा चेहरा असलेल्या लोकप्रिय नेते अलेक्स नव्हाल्नी यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झालाय. त्यामुळे पुतिन यांची कामाची पद्धत ही अशी बहुआयामी असून त्यांनी आपल्या भोवती अनेक दंतकथाही तयार केल्याचं पाहायला मिळतं.

हेही वाचा :

व्‍लादीमिर पुतिनचा 100 अब्ज डॉलरचा रहस्‍यमय बंगला, फोटो व्हायरल करणाऱ्याच्या जीवाला धोका का?

रशियाकडून 9 लाख कोटी रुपयांचं सोने खरेदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची नवी चाल काय?

पुतीन यांची सर्वात मोठी चाल, खून, चोरी किंवा षडयंत्र, काहीही केलं तरी आजन्म संरक्षण

व्हिडीओ पाहा :

Special Story on Russia President Vladimir Putin and his secret of political success how he works

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें