AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुराणची प्रत जाळणाऱ्या सलवान मोमिका याला स्वीडनमध्ये गोळ्या घालून ठार केले

इराकी कुराणाची प्रत जाळणाऱ्या सलवान मोमिका याची स्वीडनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अधिकारी या घटनेनंतर घटनास्थली पोहचले असून मोमिका याच्या मृतदेहाची ओळख पटल्याचे स्वीडीश पोलिसांनी म्हटले आहे.

कुराणची प्रत जाळणाऱ्या सलवान मोमिका याला स्वीडनमध्ये गोळ्या घालून ठार केले
| Updated on: Feb 02, 2025 | 6:27 AM
Share

इराकी कुराणची प्रत जाळणाऱ्या सलवान मोमिका याची स्वीडनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे साल २०२३ मध्ये ईद-उल-अजहा ( बकरीद ) आधी मोमिका याने स्वीडनमध्ये इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणची प्रत जाळली होती. विशेष म्हणजे त्याने पोलिसांकडून त्यासाठी परवानगी देखील मागितली होती.  स्थानिय मीडियातील बातम्यानुसार सलवान मोमिका याला अज्ञात हल्लेखोरांनी सोडरटाल्जेच्या होव्सजो येथे गोळ्या घालून ठार केले आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर स्वीडीश अधिकारी घटनास्थळावर पोहचले आहेत.

या हत्येचा व्हिडीओ सीसीटीव्ही कैद झाल्याचे म्हटले जात आहे. कारण गोळीबाराच्या घटनेच्या आधी तो लाईव्ह स्ट्रीमवर आला होता. स्थानिक पोलिसांना मृत पावलेला इसम हा सलवान मोमिका ( ३८ ) असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इराकी कुराण जाळल्यानंतर मोमिका याला लागोपाठ जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. साल २०२३ मध्ये ईद-उल-अजहा ( बकरीद ) च्या आधी त्याने स्वीडन येथे इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणच्या प्रतीला जाळले होते. यासाठी त्याने पोलिसांकडून रितसर परवानगी देखील मागितली होती. त्याला पोलिसांनी तशी परवानगी देखील देण्यात आली होती. त्यानंतर त्याने कुराणला जाळत निदर्शने केली होती.

कोण आहे कुराण जाळणारा सलवान ?

इराकचा रहिवासी असलेला सलवान मोमिका हा इस्लामिक विचार आणि मान्यतांचा टीकाकार आहे. मोमिका याचे म्हणणे होते की स्वीडनने नाटोत सामील होण्याच्या विरोधात नाही तर इस्मालचा विरोध करण्यासाठी त्याला कुराण जाळायचे होते असे त्याने स्पष्ट केले होते. कुराण जाळण्याआधी त्याने,’ स्वीडन जागो, ही लोकशाही आहे’ असे म्हटले होते. मोमिका याने कुराण जाळल्यानंतर अनेक मुस्लीम देशांनी त्याचा कठोर शब्दात निषेध केला होता.

त्यानंतर मोमिका याने स्वीडन सोडून नॉर्वे देशात शरण घेण्याची योजना बनविली होती. वास्तविक स्वीडनच्या सरकारने त्याचे रेसिडेंसी परमिट रद्द केले होते. मोमिका स्वीडनमध्ये एक इराकी शरणार्थी होते.  स्वीडनमध्ये अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांची सुरक्षा हे सर्वात मोठे असत्य आहे असे स्वीडन सोडल्यानंतर मोमिका याने म्हटले होते.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.