AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाचवेळी झाली जुळी मुलं… माय एक पण बाप निघाले दोन… सगळ्यांनाच प्रचंड धक्का, नेमकी काय आहे भानगड?

Twins Different Fathers : नॉटिंगहममधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या दोन बहिणींना, ज्या गेली 50 वर्षे स्वतःला जुळ्या समजत होत्या, एका DNA चाचणीमुळे मोठा धक्का बसला.

एकाचवेळी झाली जुळी मुलं... माय एक पण बाप निघाले दोन... सगळ्यांनाच प्रचंड धक्का, नेमकी काय आहे भानगड?
TwinsImage Credit source: Google
| Updated on: May 06, 2026 | 9:32 PM
Share

अनेकदा महिलांना जुळी बालके होतात. दोन्ही बाळामध्ये इतके साम्य असते की त्यांच्यातील फरकही ओळखू येत नाही. आता ब्रिटनमधील नॉटिंगहममधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या दोन बहिणींना, ज्या गेली 50 वर्षे स्वतःला जुळ्या समजत होत्या, एका DNA चाचणीमुळे मोठा धक्का बसला. चाचणीनंतर त्यांना कळले की त्या जुळ्या तर आहेत, पण त्यांचे जैविक वडील वेगवेगळे आहेत. म्हणजे एकाच वेळी जन्मलेल्या या दोघींची आई एकच आहे मात्र बाप वेगवेगळे आहेत. मात्र हे कसं शक्य आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेमकी भानगड काय?

सुमारे 50 वर्षे मिशेल आणि लॅव्हिनिया ऑस्बॉर्न यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण एकत्र घालवला. मात्र त्यांच्या वडिलांबाबत त्यांना नेहमीच शंका होती. म्हणून त्यांनी DNA टेस्ट केली आणि धक्कादायक सत्य समोर आले. दोघींची आई एकच, पण वडील वेगवेगळे. या दुर्मिळ घटनेला वैद्यकीय भाषेत हेदरपॅटर्नल सुपरफेक्युंडेशन असे म्हणतात.ही अवस्था तेव्हा निर्माण होते जेव्हा एका मासिक पाळीच्या चक्रात महिलेमध्ये दोन अंडे तयार होतात आणि अतिशय कमी वेळेत दोन वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध आल्यामुळे ती दोन्ही अंडी वेगवेगळ्या शुक्राणूंनी फलित होतात. जगभरात अशी 24 पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत, आणि ब्रिटनमध्ये हा पहिलाच प्रकार मानला जातो.

दोघींना संशय कसा आला?

जुळ्या बहिणींच्या आईने जेम्स नावाच्या व्यक्तीला त्यांचा वडील असल्याचे सांगितले होते, पण तो खूप कमी वेळा त्यांना भेटायचा. काही वर्षांनी मिशेलला जेम्सच्या फोटोशी स्वतःचे साम्य दिसले नाही, त्यामुळे तिला संशय आला आणि तिने DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टमध्ये जेम्स नव्हे, तर एलेक्स नावाचा व्यक्ती तिचे खरे वडील असल्याचे समोर आले. यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

जेव्हा एलेक्सचा DNA लॅव्हिनिया ऑस्बॉर्नसोबत जुळला नाही, तेव्हा चिंता आणखी वाढली. शेवटी आर्थर नावाच्या व्यक्तीला लाविनियाचे जैविक वडील म्हणून ओळख मिळाली. आता त्यांच्यात चांगले नाते निर्माण झाले आहे. लाविनिया सांगते की, तिला नेहमी काहीतरी वेगळं वाटायचं, पण आता तिला हवी होती ती शांती मिळाली आहे. दुर्दैवाने, ज्या दिवशी मिशेलला DNA टेस्टचे निकाल मिळाले, त्याच दिवशी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे अनेक रहस्ये कायमची तिच्यासोबत गेली.

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....