सांता क्लॉज आला, कोरोना देऊन गेला, तब्बल 121 जणांना संसर्ग, 5 जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरलने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. याचदरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे सर्व सणसुद्धा कमी उत्साहात साजरे करण्यात येत आहेत.

सांता क्लॉज आला, कोरोना देऊन गेला, तब्बल 121 जणांना संसर्ग, 5 जणांचा मृत्यू

बेल्जियम : कोरोना व्हायरलने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. याचदरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे सर्व सणसुद्धा कमी उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. मात्र, ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सांता क्लॉसने (Santa Claus) 157 लोकांना कोरोना बाधित केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  हे प्रकरण बेल्जियमच्या (Belgium) मोल शहरातील एका केअर होममधील आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Santa Claus made 157 people corona positive)

एका माहितीनुसार, 121 लोक आजारी पडले होते. तर यापैकी पाच लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना दोन आठवड्यांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सांता क्लॉज आपल्या सहकाऱ्यांसह दोन आठवड्यांपूर्वी बेल्जियमच्या केअर होम येथे दाखल झाला. या केअर होममध्ये, कोरोनाची अनेक प्रकरणे आढळल्यानंतर, तेथे राहणाऱ्या सर्व लोकांची आणि काळजी घेणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांची चाचणी घेण्यात आली. येथे 157 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

तेथील स्थानिक महापौर विम कीयर्स म्हणाले की, पुढील काही दिवस खूप कठीण जाणार आहेत. केअर होमसाठी हा वाईट काळ आहे. यापूर्वी महापौरांनी सांताक्लॉजच्या केअर होमला भेट देताना हे नियम पाळले जात असल्याचे विधान केले होते. तथापि, केअर होमची फोटो पाहिल्यानंतर महापौर म्हणाले की, येथे नियमांचे पालन केले जात नाही. म्हणूनच, या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, केअर होमने निष्काळजीपणा घेतला आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोनाशी लढाई जिंकता-जिंकता नाताळमध्ये अचानक रुग्ण वाढले, दक्षिण कोरियात नेमकं काय झालं?

Special Report | अमेरिकन कंपनी मॉडर्नाला विश्वास, नव्या विषाणूवर प्रभावशाली?

(Santa Claus made 157 people corona positive)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI