शेख हसिना यांच्या कट्टर विरोधकावर भर दिवसा हल्ला, थेट डोक्यात गोळी घातली, बांगलादेशमध्ये खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, बांगलादेशमध्ये शेख हादी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे, गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. ढाकाच्या पॉल्टन परिसरात भर दिवस अपक्ष उमेदवार आणि इंक्लाब मंचाचे प्रवक्ता शरीफ उस्मान हादी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हादी हे रिक्षात बसून जात होते, त्याचवेळी तिथे एक मोटरसायकल आली, ज्यावर दोन बंदुकधारी व्यक्ती होते. या बाईकवर मागे बसलेल्या तरुणाने आपल्या हातामधील बंदुकीनं एकदम जवळून हदी यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे, भर दिवसा हा हल्ला करण्यात आला आहे, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र हे बाईकस्वार व्यक्ती नेमके कोण होते, हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही, कारण त्यांनी हेल्मेट घातलं होतं.
दरम्यान जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा हादी यांचे मित्र मोहम्मद रफी हे देखील त्यांच्या पाठी मागून येत होते. समोर आलेल्या माहितीनुसार ते नमाजवरून घरी परतत होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. गोळी लागल्यामुळे हादी जमिनीवर कोसळले, ही घटना दुपारी दोन वाजून 25 मिनिटांच्या आसपास घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेमध्ये हादी हे गंभीर जाखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हादी यांच्या डोक्याच्या डाव्या बाजुने गोळी मारण्यात आली होती, ती गोळी त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजुने बाहेर निघाली आहे, एवढा भयंकर हा हल्ला होता.
डॉक्टरांनी दिलेल्या हेल्थ अपडेटनुसार हादी यांची प्रकृती खूप चिंताजनक आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत,ऑपरेशन देखील करण्यात येणार आहे. दरम्यान इंकलाब मंचची स्थापना ही बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांचा पक्ष बरखास्त करा या मागणीसाठी करण्यात आली होती, या मंचचे हादी हे प्रवक्ते होते, त्यांच्यावर भरदिवसा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली .
