AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेख हसीना अजूनही लंडनमध्ये नो एन्ट्री, भारताच्या परराष्ट्रामंत्र्यांची ब्रिटनशी चर्चा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत चर्चा केली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना लंडनमध्ये जायचे आहे. पण त्यांना अजून ब्रिटनकडून परवानगी मिळालेली नाही. जर त्यांना परवानगी मिळाली नाही तर ते इतर कोणत्या देशात जाणार याबाबत ही गुप्तता बाळगली जात आहे.

शेख हसीना अजूनही लंडनमध्ये नो एन्ट्री, भारताच्या परराष्ट्रामंत्र्यांची ब्रिटनशी चर्चा
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 08, 2024 | 7:02 PM
Share

बांगलादेशमध्ये घडामोडी घडत असतानाच माजी पंतप्रधान शेख हसीना (Shailh Hasina) या लंडनला जाणार की नाही याची देखील चर्चा सुरु आहे. त्या सध्या भारतात आश्रयात आहेत. यादरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “परराष्ट्र मंत्री यांनी काही तासांपूर्वीच परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांची बांगलादेश आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर चर्चा झाली.

शेख हसीना लंडनला जाणार?

शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर त्यांनी भारतामध्ये आश्रय घेतलाय. आता त्यांना लंडनमध्ये जायचे आहे. पण यूकेकडून अजून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना भारतातच राहावे लागत आहे. ब्रिटनने राजकीय आश्रय देण्याबाबत त्यांच्याकडे कोणताही नियम नसल्याचे म्हटले होते. पण तरी देखील यावर प्रक्रिया सुरु असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही शेख हसीना यांच्या भविष्यातील योजनांबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

भारतीयांना परत आणण्याचा प्रयत्न

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक लोकांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्यात आलाय. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. रणधीर जैस्वाल म्हणाले की, “आम्ही ढाकामधील अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. बांगलादेशच्या लोकांचा जवळचा मित्र म्हणून आम्हाला देशात लवकरच शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. स्थैर्य शक्य तितक्या लवकर पुनर्संचयित केले जावे जेणेकरुन सामान्य जीवन पुन्हा सुरू होईल.

रणधीर जैस्वाल पुढे म्हणाले की, “बांग्लादेशमध्ये 9,000 विद्यार्थ्यांसह 19,000 लोक आहेत. त्यापैकी बहुतेक लोक परत आले आहेत. आमचे उच्चायुक्तालय त्यांना मदत करत आहे. विमानसेवा सुरू आहे. बरेच लोक परत आले आहेत. आमचे अनावश्यक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य ही माघारी आले आहेत. आशा आहे की परिस्थिती लवकरच सामान्य होईल.”

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?