Bangladesh Voilence : मुजीबुर्रहमान यांचं घर पेटवलं, बांग्लादेशात पुन्हा राडा, अनेक शहरात हिंसाचार, आता कारण काय?
Bangladesh Voilence : त्यांनी सुरुवातीला रात्री 9 वाजता घरावर बुलडोझर चालवण्याची धमकी दिली होती. पण आंदोलकांनी आपली योजना बदलली व 8 वाजताच बुलडोझर घेऊन पोहोचले. या आंदोलनाला त्यांनी एका रॅलीच स्वरुप दिलं होतं.

बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. अवामी लीगच्या आज 6 फेब्रुवारीला होणाऱ्या देशव्यापी विरोध प्रदर्शनाच्याआधी राजधानी ढाकासह बांग्लादेशच्या अनेक शहरात हिंसाचार झाला आहे. आंदोलकांनी ढाकाच्या धानमंडी भागातील शेख मुजीबुर्रहमान यांच्या घरावर हल्ला केला आहे. हल्ला करणारे बुलडोझर घेऊन आले होते. त्यांनी शेख मुजीबुर्रहमान यांचं घर पेटवून दिलं. हजारोंच्या संख्येने अवामी लीगचे समर्थक, कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक झाली आहे. 6 फेब्रुवारीला शेख हसीना यांच्या अवामी लीगने कार्यकर्ते आणि नेत्यांना रस्त्यावर उतरण्याच आवाहन केलं होतं.
अवामी लीगने गुरुवारी बांग्लादेशात ट्रांसपोर्ट सिस्टम बंद करुन हायवेसह अनेक शहरात जाम करण्याची तयारी केली होती. अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात अवामी लीगने मोठ्या प्रदर्शनाच आवाहन केलं होतं. अवामी लीगच्या प्रदर्शनाच्या ठीक एकदिवस आधी बांग्लादेशमध्ये स्थिती गंभीर बनली आहे. ढाका ट्रिब्यूनच्या रिपोर्ट्नुसार समाजकंटक गेट तोडून जबरदस्तीने शेख मुजीबुर्रहमान यांच्या घराच्या आत घुसले. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्या ऑनलाइन भाषणावरुन हे विरोध प्रदर्शन सुरु झालं आहे.
मेन गेट तोडून आत प्रवेश
शेख हसीना यांच्या भाषणाविरोधात आंदोलकांनी धानमंडी 32 येथे बुलडोजर मार्च काढण्याची घोषणा केली. त्यांनी सुरुवातीला रात्री 9 वाजता घरावर बुलडोझर चालवण्याची धमकी दिली होती. पण आंदोलकांनी आपली योजना बदलली व 8 वाजताच बुलडोझर घेऊन पोहोचले. या आंदोलनाला त्यांनी एका रॅलीच स्वरुप दिलं होतं. मोठा जमाव होता. मेन गेट तोडून आत प्रवेश केला व मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
प्रॉपर्टीच मोठ नुकसान
प्रदर्शनादरम्यान शेख हसीना यांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. अनेक हल्लेखोर घराच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत चढून गेले. त्यांनी बांग्लादेशच्या संस्थापकांचे फोटो आणि अन्य सामानाची तोडफोड केली. या हल्ल्यात प्रॉपर्टीच मोठ नुकसान झाल्याची माहिती आहे. याआधी विद्यार्थी आंदोलनाचा संयोजक हसनत अब्दुल्लाने फेसबुकवर एक पोस्ट टाकून आज रात्री, बांग्लादेशची भूमी फासीवादामधून मुक्त होईल असं म्हटलं होतं.