अमेरिकेत हाहा:कार, संपूर्ण देश ठप्प, मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराने थेट…
डोनाल्ड ट्रम्प जगभरात टॅरिफचा थयथयाट करत असतानाच अमेरिकेत थेट शटडाऊन झालंय. यादरम्यान काही गंभीर आरोप व्हाईट हाऊसकडून करण्यात आली. हेच नाही तर आता थेट इशारा देखील देण्यात आलाय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या देशांना धमक्या देऊन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसऱ्या देशांना धमक्या देऊन थयथयाट करण्यादरम्यान अमेरिकेत हाहा:कार माजलाय. अमेरिकेत शटडाउन सुरू आहे आणि याचा मोठा फटका बसताना दिसतोय. आता नुकताच डोनाल्ड यांच्या आर्थिक सल्लागाराने अत्यंत मोठा इशारा दिलाय. हेच नाही तर जास्त काळ शटडाउन सुरू राहिले तर गंभीर आणि वाईट परिणाम भोगावे लागतील असेही त्यांनी म्हटले. व्हाईट हाऊसने म्हटले की, दर आठवड्याला शटडाऊन सुरू राहिल्याने अमेरिकेच्या जीडीपीला 15 अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. हेच नाही तर त्यांनी मोठा इशारा देत म्हटले, जर हे शटडाऊन महिनाभर सुरू राहिले तर 43,000 लोक बेरोजगार होतील, हे नक्की आहे.
या परिस्थितीवर बोलताना व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी म्हटले की, सरकारी बंदचा आर्थिक परिणामांची जबाबदारी सिनेट डेमोक्रॅट्सवर आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना मोफत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी संघराज्य सरकार, अर्थव्यवस्था आणि देशाला कोण ओलीस ठेवत आहेत?, असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. व्हाईट हाऊसच्या प्रवक्तांनी या शटडाऊनसाठी डेमोक्रॅट्सना जबाबदार ठरवले आहे.
एडीपीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या 32,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक सल्लागारांनी यादरम्यान शटडाऊनबद्दल दिलेल्या अहवालात धक्कादायक बाब मांडली आहे. त्यांच्या चार पानांच्या अहवालानुसार, हे शटडाऊन अक महिना सुरू राहिले तर त्याचा गंभीर वाईट परिणाम होईल. व्हाईट हाऊसकडून यादरम्यान मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून इतर देशांना टॅरिफ लावून जेरीस आणत असतानाच त्यांच्या देशात खळबळ उडाली आहे. अमेरिकेतूनही डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला जोरदार विरोध होताना दिसत आहे. अनेक टेक कंपन्यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या विरोधात मैदानात उतरण्याची भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीकता वाढल्याचेही बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.
