Special Story : अमेरिकेतील सत्ताबदल, शपथविधी, ट्रम्प पायउतार.. सत्ताबदलापूर्वी अमेरिकेत काय घडतंय?

Special Story : अमेरिकेतील सत्ताबदल, शपथविधी, ट्रम्प पायउतार.. सत्ताबदलापूर्वी अमेरिकेत काय घडतंय?

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. मात्र, अद्यापही अधिकृतरित्या अमेरिकन निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 04, 2021 | 12:58 AM

वॉशिंग्टन : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. मात्र, अद्यापही अधिकृतरित्या अमेरिकन निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही हा निवडणूक निकाल अमान्य करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचा शपथविधी होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जातेय. बायडन यांनी निवडणुकीत 279 मते घेऊन विजय मिळवला, तर ट्रम्प यांना अवघे 214 मतं मिळाली आहेत. मात्र, सध्या अमेरिकेत सत्तांतरापूर्वी नेमकं काय घडतंय याकडे अनेकांचं लक्ष आहे (Special Story Know all about political happening in America after US presidential Election).

सत्ताबदलापूर्वी अमेरिकेत काय घडतंय? संपूर्ण घटनाक्रम

अमेरिकेच्या निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान, ट्रम्प यांच्या खटल्यांचा निर्णय जाहीर

अमेरिकेचे अध्यक्षीय निवडणुकीत (US Presidential Election 2020) रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. ही चुरस इतकी वाढली की ट्रम्प यांनी निवडणूक निकालाला थेट न्यायालयात आव्हान दिलं. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निकाल अमान्य करत 60 ठिकाणी खटले दाखल केले होते. त्यामुळे यावर न्यायालय काय भूमिका घेणार आणि अमेरिकेचा पुढील अध्यक्ष कोण होणार याकडे जगभरातील लोकांचं लक्ष होतं. मात्र, अखेर न्यायालयाने हे खटले फेटाळले आहेत.

‘डोनाल्ड ट्रम्प यांचा नकाराधिकार अमेरिकन काँग्रेसने फेटाळला’

अमेरिकन काँग्रेसनं मंजूर केलेल्या एका विधेयकावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला नकाराधिकार वापरला होता. पण अमेरिकन संसदेने या मुद्द्यावर मतदान घेऊन ट्रम्प यांचा नकाराधिकारच फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात असं पहिल्यांदाच घडलं आहे. हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. संसदेने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एक विशेष सत्र बोलावलं होतं.

विधेयकानुसार, येत्या वर्षात अमेरिकेच्या सुरक्षा विषयक धोरणावर 740 अब्ज डॉलर खर्च केले जाणार आहेत. संसदेने नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन अॅक्ट (ADAA) या विधेयकाला 81 विरुद्ध 13 मतांच्या फरकाने मंजुरी दिली. अमेरिकेतील कायद्यानुसार, राष्ट्राध्यक्षांचा नकाराधिकार फेटाळून लावण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत असावं लागतं. त्याप्रमाणे अमेरिकन संसदेने 2/3 बहुमताने हे विधेयक फेटाळलं. विशेष म्हणजे अमेरिकन संसदेत सध्या ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची सत्ता असल्याने ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. ट्रम्प यांचा कार्यकाळ 20 जानेवारी 2021 रोजी संपत आहे.

राष्ट्राध्यक्ष निकाल उशिराने घोषित करण्यासाठी काही सिनेटर्सकडून प्रयत्न

रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर टेड क्रुझ यांच्या नेतृत्वात 11 सिनेटर्सने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल 10 उशिराने जाहीर करण्याची मागणी केलीय. त्यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत या निवडणुकीचं ऑडिट करण्याची मागणी केलीय. विशेष म्हणजे अमेरिकेचे मावळते उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिलाय. तसेच लाखो अमेरिकन नागरिकांना या निकालाविषयी साशंकता असल्याचा दाव पोन्स यांनी केलाय.

असं असलं तरी ही मागणी फेटाळली जाण्याचीच अधिक शक्यता आहे. कारण बहुतांश सिनेटर्स 6 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात जो बायडन यांनाच पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जातेय. ट्रम्प यांचा कार्यकाळ 20 जानेवारीला संपत असून त्याच दिवशी जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतील. विशेष म्हणजे सिनेटर्सचे प्रमुख म्हणून बायडन यांच्या निवडीला आव्हान देणारे उपराष्ट्राध्यक्ष पेन्स यांनाच बायडन यांच्या विजयाची घोषणा करावी लागणार आहे.

अमेरिकेतील सर्वच्या सर्व 50 राज्यांनी आपले निवडणूक निकाल घोषित केलेत. यातील काही निकालांना न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं, मात्र यात ट्रम्प यांच्या समर्थकांची मागणी फेटाळत निकाल घोषित करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला होता. ट्रम्प यांच्या टीमने अमेरिकेत तब्बल 60 ठिकाणच्या निकालाला न्यायालयात आव्हान दिलं होतं.

हेही वाचा :

अमेरिकेच्या निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान, ट्रम्प यांच्या 5 खटल्यांचा निर्णय जाहीर

आधी ओबामांसोबत महत्त्वाची जबाबदारी, आता बायडन यांच्या कॅबिनेटमध्येही भारतीय वंशाच्या दोघांची वर्णी निश्चित?

अमेरिकेत सत्ताबदल होताच TikTok ची डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात कोर्टात याचिका

Special Story Know all about political happening in America after US presidential Election

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें