श्रीलंकेतील सत्ता पालटाचा अदानीना फटका बसणार का? नवे राष्ट्रपती भारताबद्दल काय विचार करतात?
Sri Lanka Election : श्रीलंकेतील निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. तिथे अनुरा दिसानायके सत्तेवर येणार आहेत. मालदीव, बांग्लादेशचा अनुभव पाहता श्रीलंकेतील हा सत्ता बदल भारताच्या दृष्टीने कसा असेल? भारताच्या फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या.

श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीचे अनुरा दिसानायके यांचा विजय झालाय. ते श्रीलंकेचे 10 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. दिसानायके यांच्या विजयानंतर प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. भारत आणि श्रीलंकेचे संबंध कसे असतील? अनुरा आणि त्यांचा पक्ष जनता विमुक्ति पेरामुना (JVP) यांची भूमिका भारतविरोधी आणि चीनकडे झुकणारी आहे. अनुरा दिसानायके यांचा विजय हा क्षेत्रीच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारताच्या चिंता वाढवणारा आहे. मागच्या महिन्यात बांग्लादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळलं. त्यानंतर तिथे सत्तेवर आलेल्या अंतरिम सरकारसोबत सामान्य संबंध ठेवणं भारतासाठी आवाहानात्मक ठरतय. अशावेळी आणखी एका शेजारी देशात भारत विरोधी सरकार सत्तेवर येणं अडचणी वाढवणारं आहे.
अनुरा दिसानायके आणि त्यांच्या पक्षाला भारत विरोधी मानलं जातं. डाव्या विचारसरणीमुळे ते चीनच्या बाजूला जास्त आहेत. अनुरा यांनी 1987 साली JVP जॉइंन केली. 1987 साली भारत-श्रीलंकेत करार झाला. अनुरा दिसानायके यांचा पक्ष या कराराविरोधात होता. अनुरा दिसानायके 2014 साली पार्टीचे प्रमुख बनले. त्यांनी भ्रष्टाचार संपवण्याचवर भर दिला. निवडणूक प्रचारादरम्यान अनुरा यांनी श्रीलंकेतील अदानी ग्रुपचा विंड पावर प्रोजेक्ट रद्द करण्याचा मुद्दा मांडला होता. श्रीलंकेत सुरु असलेल्या चीनच्या काही प्रकल्पांवर सुद्धा त्यांचा आक्षेप आहे.
हा बदल भारतासाठी कसा असेल?
हंबनटोटा आणि कोलंबो पोर्ट प्रोजेक्टमध्ये पारदर्शकता नसल्याच अनुरा आणि त्यांच्या पक्षाच मत आहे. अनुरा दिसानायके यांच्यासाठी भ्रष्टाचार आणि पारदर्शकता हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. कुठलाही प्रकल्प रद्द करण्याऐवजी त्यात सुधारणा करण्यावर त्यांचा भर असेल. पण या सुधारणा भारताच्या दृष्टीने चांगल्या असणार की नाही? हे येणाऱ्या काळातच समजेल.
पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांना कसा प्रतिसाद दिला?
अलीकडे भारताबद्दल अनुरा दिसानायके यांची भूमिका बदलल्याच दिसून आलय. श्रीलंकेचा समुद्र, भूमी आणि हवाई क्षेत्राचा भारताविरुद्ध वापर होऊ देणार नाही हे दिसानायके यांनी स्पष्ट केलय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा संदेशाला उत्तर देताना दोन्ही देशातील मजबूत संबंधांसाठी कटिबद्ध असल्याच म्हटलं आहे.
सात महिन्यांपूर्वी आलेले भारतात
श्रीलंकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक होण्याआधी भारताने कुटनितीक प्रयत्न सुरु केले होते. अनुरा दिसानायके सात महिन्यांपूर्वी भारत सरकारच्या निमंत्रणावरुन भारतात आले होते. अनुरा यांनी नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि NSA अजित डोवाल यांची भेट घेतली होती. आज JVP च भारताबद्दलच मत बदलतय त्यामागे कारण हाच दौरा आहे.
