AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडीअडचणीत भारताच्या कामी आला 1000 वर्षे जुना यार, होर्मुझ संकटात उघडला नवा दरवाजा

28 फेब्रुवारीपासून इराण युद्ध सुरु झाल्यानंतर होर्मुझ स्ट्रेट बंद झाली आहे. हे संकट आणखी किती दिवस चालणार हे कोणालाच माहिती नाही. यात भारताच्या मदतीला त्याचा 1000 वर्षे जुना यार कामी आला आहे.

अडीअडचणीत भारताच्या कामी आला 1000 वर्षे जुना यार, होर्मुझ संकटात उघडला नवा दरवाजा
singapore
| Updated on: May 17, 2026 | 3:47 PM
Share

इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारताच्या व्यापारावर देखील दिसू लागला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर भारताच्या निर्यातीच्या मार्गात मोठा बदल झाला आहे. याचा परिणाम म्हणून एप्रिल २०२६ मध्ये सिंगापूर हा संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईला मागे टाकत भारताचा दुसरा सर्वात मोठा निर्यात गंतव्य बनला आहे. अमेरिकेनंतर आता सिंगापूर भारतासाठी सर्वात मोठा निर्यात बाजार म्हणून पुढे आला आहे. हा बदल केवळ आकड्यांपर्यंत मर्यादित नसून बदलत्या भौगोलिक आणि राजकीय संकटात काही महिन्यात पुरवठा साखळी आणि ट्रेड मॅप कसे बदलू शकतात हे दाखवत आहे.

एप्रिल २०२६ मध्ये भारतातून सिंगापूरला निर्यात वाढून १८० टक्के म्हणजे ३.२० अब्ज डॉलरवर पोहचली आहे. गेल्यावर्षी याच काळात ही निर्यात १.१४ अब्ज डॉलर होती. दुसरीकडे युएईला होणारी निर्यात ३६ टक्के घसरून केवळ २.१८ अब्ज डॉलरवर पोहचली आहे, गेल्यावर्षी ही युएईला होणारी निर्यात ३.४३ अब्ज डॉलर होती. दीर्घकाळापर्यंत युएई भारताचे दुसरे सर्वात मोठे एक्सपोर्ट मार्केट होते, परंतू त्याच्या जागी सिंगापूरने घेतली आहे. व्यापारी तज्ज्ञांच्या मते हा बदल थेटपणे होर्मुझ सामुद्रधुनी संकटाशी जोडलेला आहे. मार्च २०२६ पासून हा महत्वाचा समुद्र मार्ग बाधित झाल्यानंतर युएईद्वारे माल वाहतूक करणे महाग आणि जोखीमपूर्ण झाले आहे. या नंतर भारतीय निर्यातकांनी पर्यायी मार्ग शोधणे सुरु केले आहे.

भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या दरम्यानचे संबंध सुमारे एक हजार वर्षे जुने आहेत. ११ व्या शतकात दक्षिण भारताच्या चोल राजांनी ( विशेष रुपाने राजेंद्र चोल प्रथम ) समुद्र मोहिमांद्वारे मलय क्षेत्रासोबत ( ज्यात सिंगापूरही सामील होते ) व्यापारिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. सिंगापूरचे मूळ नाव ‘सिंहपुरा’( सिंहांचे शहर ) हे देखील संस्कृत भाषेवरुन प्रेरित होते.यावरुन सिंगापूरशी भारताचे असलेले नाते सिद्ध होते.

आखाती देशांशी व्यापारात मोठा बदल

केवळ निर्यातच नाही तर आयातीच्या आकड्यातही मोठा बदल दिसत आहे. एप्रिलमध्ये ओमान (Oman) शी भारताची आयात तीन पट वाढली आहे.दुसरीकडे कतार (Qatar)आयात ४७ टक्के घटली आहे. सौदी अरबशी (Saudi Arabia)आयात पुन्हा वाढ पाहायला मिळाली आहे. या बदलांमुळे हे स्पष्ट आहे की भारत आता केवळ पारंपारिक आखाती मार्गांवर अवलंबून राहू इच्छीत नाही. कंपन्या असे मार्ग आणि देशांना प्राथमिकता देत आहे. जेथे पुरवठा साखळी जास्त सुरक्षित आणि स्थिर असेल.

भारतासाठी काय महत्वाचे ?

या बदलामागे एक सकारात्मक पैलू हा आहे की भारताच्या निर्यात बाजारात विविधता वाढत आहे. ASEAN देशांशी व्यापार मजबूत झाल्याने भारतीय कंपन्यांना नवी संधी मिळू शकते. मात्र, दुसरीकडे नवा समुद्री मार्ग आधीच्या तुलनेत जास्त महाग पडू शकतो. ज्यामुळे एक्सपोर्ट कॉस्ट वाढण्याचा धोका कायम राहिल. स्ट्रेट ऑफ होर्मुझ संकट जर दीर्घकाळ सुरुच राहिले तर सिंगापूर भारतासाठा स्थायी रुपाने एक मोठा निर्यात हब बनू शकतो. हेच कारण आहे की आता भारताची नजर दक्षिण पूर्ण आशिया आणि ASEAN क्षेत्रासोबत व्यापार वाढवण्यावर केंद्रीत आहे.

Follow Us
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?