AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Switzerland Suicide Machine | एका मिनिटात वेदनेशिवाय मृत्यू, ‘डॉ. डेथ’च्या संशोधनाला कायदेशीर मंजुरी

स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये 1,300 नागरिकांनी इतरांच्या मदतीने आत्महत्या केल्याचा दावा एक्झिट इंटरनॅशनलने केला आहे.

Switzerland Suicide Machine | एका मिनिटात वेदनेशिवाय मृत्यू, 'डॉ. डेथ'च्या संशोधनाला कायदेशीर मंजुरी
स्वित्झर्लंडमध्ये सुसाईड मशिनला मान्यता
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 9:27 AM
Share

Switzerland Suicide Machine : स्वित्झर्लंड सरकारने सुसाईड मशीनच्या वापराला कायदेशीर मान्यता दिली आहे. मशिनच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीचा केवळ एका मिनिटात वेदनेविना मृत्यू होऊ शकतो, असा मशीन बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे. हे यंत्र शवपेटीच्या आकारात बनवले आहे. या मशिनद्वारे ऑक्सिजनची पातळी खालावत जाऊन अवघ्या 1 मिनिटात माणसाचा मृत्यू होतो.

एक्झिट इंटरनॅशनल (Exit International) नावाच्या संस्थेचे संचालक डॉ. फिलीप निट्स्के (Dr Philip Nitschke) यांनी हे ‘मशीन ऑफ डेथ’ तयार केले आहे. त्यांना ‘डॉ. डेथ’ असेही संबोधले जाते.

इच्छामरणाला कायदेशीर मान्यता

स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये 1,300 नागरिकांनी इतरांच्या मदतीने आत्महत्या केल्याचा दावा एक्झिट इंटरनॅशनलने केला आहे.

डोळे मिचकावून मृत्यूला निमंत्रण

आजारपणामुळे हालचाल करु शकत नसलेल्या व्यक्तींसाठी हे मशीन बनवण्यात आल्याचं बोललं जातं. ब्रिटिश वेबसाईट इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार, हे मशीन आतूनही चालवता येते. आजारी व्यक्तीही मशीनच्या आत डोळे मिचकावून हे यंत्र ऑपरेट करु शकते. या मशीनमध्ये बायोडिग्रेडेबल कॅप्सूल आहे ज्याचा वापर शवपेटी म्हणूनही केला जाऊ शकतो.

या मशीनला सारको (Sarco) असे नाव देण्यात आले असून त्याचा प्रोटोटाइप नुकताच सादर करण्यात आला आहे. डॉ. निट्स्के यांनी सांगितले की, ‘सर्व काही सुरळीत राहिल्यास पुढील वर्षापर्यंत हे यंत्र उपलब्ध होईल. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा प्रकल्प आहे, परंतु आम्ही त्याच्या पूर्ततेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत.

डॉ. निट्स्के टीकेचे धनी

दरम्यान, हे मशीन बनविल्याबद्दल डॉ. निट्स्के यांच्यावर टीकाही होत आहे. इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार काही जणांनी मशीनचा वापर करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे धोकादायक गॅस चेंबर असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. या मशीनमुळे लोकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाईल, असेही काही लोकांचे म्हणणे आहे. सध्या दोन मशीनचे प्रोटोटाइप तयार आहेत. तिसर्‍या मशिनचीही निर्मिती केली जात असून पुढील वर्षभरात ते तयार होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

 पुण्यातील उच्चभ्रू भागात बोगस हेअर ट्रान्सप्लांट रॅकेट, 300 जणांची लाखोंना फसवणूक

ड्रायव्हरला डुलकी, पंढरपूरहून परतणारा भाविकांचा टेम्पो उलटला, 35 जण जखमी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.