धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये नरसंहार, सैनिकांनी फरफटत नेलं, धाड धाड गोळ्या घातल्या!
सध्या जागतिक पातळीवर अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठं युद्ध चालू आहे. तर दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातही मोठा संघर्ष चालू आहे. याच कराणामुळे संपूर्ण जग युद्धाच्या खाईत लोटले जाते की काय, अशी शंका वारंवार उपस्थित केली जात आहे.

Syria Hospital Viral Video : सध्या जागतिक पातळीवर अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठं युद्ध चालू आहे. तर दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातही मोठा संघर्ष चालू आहे. याच कराणामुळे संपूर्ण जग युद्धाच्या खाईत लोटले जाते की काय, अशी शंका वारंवार उपस्थित केली जात आहे. दरम्यान, एकीकडे या घडामोडी घडत असतानाच रशियाच्या सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने (एसओएचआर) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आणला आहे. या व्हिडीओत काही सैनिक रुग्णालयातील लोकांना धाड धाड गोळ्या घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे दिसतेय
एसओएचआरने हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या व्हिडीओत सिरीयाचे राष्ट्रपती अहमद अल शरा यांच्या सरकारचे प्रामाणिक समजले जाणारे सैनिक एका रुग्णालयात लोकांची हत्या करताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार हा व्हिडीओ स्वैदा नॅशनल हॉस्पिटलमधील आहे. व्हिडीओत रुग्णालयाचा गणवेश घालून काही लोक खाली बसलेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे दिसत आहे. या लोकांना सिरीयाच्या संरक्षण आणि गृहमंत्रालयाशी संबंधित असलेले शस्त्रधारी लोक उभे असल्याचे दिसत आहे.
धाड धाड घातल्या गोळ्या
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत लोक भयभीत होऊन खाली बसलेले दिसत आहेत. तसेच यातील एका व्यक्तीवर शस्त्रधारी व्यक्तीने उभे राहून धाड धाड गोळ्या घातल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. विशेष म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संबंधित व्यक्तीला फरफटत नेल्याचही या व्हिडीओत दिसत आहे. हे सर्व दृश्य पाहून व्हिडीओतील लोक भयभीत झाले आहेत. याच व्हिडीओत पुढे शस्त्रधारी लोकांनी इतरांनाही गोळ्या घातल्याचे दिसत आहे. या गोळीबारात अनेकजण जमिनीवर पडले आहेत. एकानंतर एक अनेकांचे मृत्यू झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच होतेय टीका
दरम्यान, ही घटना स्वेदा शहरातील असल्याचे सांगितले जात आहे. द्रुज योद्धे आणि सुन्नी बेडॉईन जनजाती यांच्यात जुलै महिन्यात संघर्ष झाला होता. याच संघर्षादरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. सिरियाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात असून या घनटेचा निषेध केला जातोय.
