Donald Trump : टॅरिफ युद्धात भारताशी स्पर्धा करणाऱ्या या देशाला ट्रम्प यांनी चार दिवसात आणलं गुडघ्यावर
Donald Trump : अमेरिकेच्या टॅरिफ वॉरने जगभरात भूकंप घडवून आणला आहे. आशिया, युरोपसह सर्वत्र हाहाकार उडाला आहे. भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. ट्रम्प यांनी घोषणा केल्यानंतर चार दिवसात एक देश गुडघ्यावर आला आहे. त्यांनी अमेरिकेला ऑफर दिली आहे.

अमेरिकन वस्तुंची आयात करताना जगातील अनेक देशात मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. त्याला प्रत्युत्तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी 180 पेक्षा अधिक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ (Deducted Reciprocal Tariff) लावला आहे. म्हणजे अमेरिकेत आयात होणाऱ्या सामानावर हा रेसिप्रोकल टॅरिफ लागणार आहे. या निर्णयामुळे जगात हाहाकार उडाला आहे. आशियाई बाजार असो, वा चिनी किंवा ऑस्ट्रेलियन बाजार. सर्वत्र घसरण पहायला मिळतेय.
भारतीय बाजार आज उघडताच तीन हजार अंकांनी घसरला. या दरम्यान दक्षिण-पूर्व आशियाई देश विएतनाममधून एक बातमी समोर आलीय. अमेरिकेने विएतनामवर 46 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यावर आता विएतनामने अमेरिकेला एक पत्र लिहिलय. त्यात त्यांनी अमेरिकेतून विएतनाममध्ये आयात होणाऱ्या सामानावर टॅरिफ न लावण्याची घोषणा केली आहे.
काय प्रस्ताव दिला?
ईटीच्या रिपोर्ट्नुसार दक्षिण-पूर्व आशियाई देश विएतनाममधील कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख टो लॅम यांनी 5 एप्रिल 2025 रोजी अमेरिकेला एक लिहिलं. त्यात त्यांनी अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या टॅरिफवर सवलत देण्याची मागणी केली होती. अमेरिकेने 9 एप्रिलनंतर पुढचे 45 दिवस टॅरिफमध्ये सवलत द्यावी. त्या बदल्यात अमेरिकन प्रोडक्ट्सना कुठल्याही टॅरिफ शिवाय सामान विकण्याची ऑफर दिली आहे.
दोघांच नुकसान
डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात जास्त टॅरिफ आशियाई देशांवर लावला आहे. यात विएतनाम, चीन प्रमुख देश आहेत. रिपोर्ट्नुसार, विएतनाम चीनचा प्रमुख बिझनेस पार्टनर बनत होता. ट्रम्प यांच्या या निर्णयाने फक्त विएतनामचच नुकसान होणार असं नाहीय, सोबत चीनवर सुद्धा याचा परिणाम दिसून येईल.
अमेरिकेने लावलेल्या या टॅरिफमुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. बातमी लिहित असताना मार्केटाच प्रमुख निर्देशांक 4 टक्क्यापेक्षा जास्त कोसळला. आता सेन्सेक्स 3049.52 अंकांसह 72,315.17 अंकावर व्यवहार करत आहे.
