Baldness | गळलेले केस परत येतील, टक्कल पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळणार, थायलंडच्या शास्त्रज्ञांचा दावा

शास्त्रज्ञांच्या मते, मँग्रोव्ह नावाच्या एका मोठ्या झाडापासून मिळणाऱ्या अर्काने टक्कल पडण्याच्या समस्येला ठीक केलं जाऊ शकतं.

Baldness | गळलेले केस परत येतील, टक्कल पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळणार, थायलंडच्या शास्त्रज्ञांचा दावा
टक्कल पडणे यावरील उपचाराबाबत अनेकजण दावे करत असतात

बँकॉक : लांब, सुंदर, दाट केस असावे असं सर्वांना वाटत असतं. पण, केस गळणे, टक्कल पडणे (Get Rid Of Baldness) हे काही सांगून येत नाही. यामुळे तुमच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम होतो. टक्कल पडणे यावरील उपचाराबाबत अनेकजण दावे करत असतात. असाच एक दावा थायलंडच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. यांच्यामते, त्यांनी ज्या औषधीचा शोध लावला आहे, त्यामुळे टक्कल पडण्याच्या समस्येपोसून पूर्णपणे सुटका मिळू शकते (Get Rid Of Baldness).

शास्त्रज्ञांच्या मते, मँग्रोव्ह नावाच्या एका मोठ्या झाडापासून मिळणाऱ्या अर्काने टक्कल पडण्याच्या समस्येला ठीक केलं जाऊ शकतं. शास्त्रज्ञांनी दावा केलाय की क्लिनिकल ट्रायलनंतर त्यांना हे यश प्राप्त झालं आहे.

एविसेक्विनन-सीमुळे केसगळणे थांबतं

केस गळण्याच्या समस्येला दूर करणाऱ्या मँग्रोव्हसच्या अर्काला एविसेनिया मरिनच्या नावाने ओळखलं जातं. यामध्ये एविसेक्विनन-सी असते जो अॅक्टिव कंपाउंट एंजाइम्ससोबत क्रिया करतो. ज्यामुळे केस गळणे थांबते. टक्कल पडण्यासाठी जबाबदार असणाऱ्या हार्मोनला कमी करण्यात मदत करतो.

शास्त्रज्ञांनी या औषधीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 50 लोकांना सहभागी करुन घेतलं आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसले. शास्त्रज्ञांच्या शोधानुसार, अर्क केसांना गळण्यापासून रोखतो आणि त्यांची वाढ हेण्यास मदत करतो. एविसेक्विनन-सी च्या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञ गोल्या अनेक वर्षांपासून याचा शोध घेत आहेत. थाईलंडच्या चुललॉन्गकोर्न यपनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना राष्ट्रीय अनुसंधान परिषद थाईलंडकडून पुरस्कारही देण्यात आला आहे.

बाजारात हे औषध कधी येणार

चाचणीमध्ये शास्त्रज्ञांनी 50 महिला आणि पुरुषांच्या केसांवर याची चाचणी केली. सर्वांना अर्कच्या लेपला डोक्यावर लावायला सांगितलं. काही दिवस या सर्वांच्या डोक्याचे फोटो घेतले आणि अर्कच्या लेपने नवीन केस येत असल्याचं पुढे आलं (Get Rid Of Baldness).

अर्कचा हा लेप बाजारात कधी येणार याची वाट सध्या सर्व पाहात आहेत. चुललॉन्गकोर्न विश्वविद्यालयाच्या फार्माकोग्नॉसी अँड फार्मास्युटिकल बॉटनीच्या प्राध्यापक वांचाई डेनामककुलने सांगितलं की, यामुळे केस गळतीच थांबणार नाही तर नवीन केस देखील येतील.

लवकरच हे औषध बाजारात येण्याची शक्यता आहे. कारण, एका खाजगी कंपनीने याचं कमर्शियल प्रोडक्शन करण्याच्या टेक्निकला पेटेंट करवलं आहे. येत्या सहा महिन्यात हे औषध बाजारात येण्याची शक्यता आहे.

Get Rid Of Baldness

संबंधित बातम्या :

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या ‘सीक्रेट महाल’चा खुलासा; सरकारविरोधी आंदोलन चिघळलं

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत Jeff Bezos यांची गर्लफ्रेण्डच्या भावाकडे 12 कोटींची मागणी

कोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलं, काही दिवसातच महिला 437 कोटींची मालक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI