AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवण करताना ट्रक ड्रायव्हरचं नशीब पालटलं, 100 रुपयांमध्ये बनला करोडपती, वाचा काय घडलं?

जेवण करताना मोती मिळाल्यानं मोनथियान या ट्रक ड्रायव्हरचं नशीब पालटलं आहे. (Truck Driver get Rare Orange Pearl)

जेवण करताना ट्रक ड्रायव्हरचं नशीब पालटलं, 100 रुपयांमध्ये बनला करोडपती, वाचा काय घडलं?
नारंगी मोती, प्रतिकात्मक फोटो, ट्विटर
| Updated on: Feb 17, 2021 | 1:49 PM
Share

नवी दिल्ली: एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलण्यास एक क्षणही पुरेसा असू शकतो, असं म्हटलं जातं. थायलंडमधील एका ट्रक ड्रायव्हरसोबत (Thailand Truck Driver) असाच प्रसंग घडला आहे. ड्रायव्हर त्याच्या पत्नीसोबत जेवण करत होता. त्यावेळी त्यांच्या हाती खजिना लागला. ट्रक ड्रायव्हर मोनथियान जानसूक याला नारंगी रंगाचा दुर्मिळ मोती(Rare Orange Pearl) सापडल्यानं त्याच नशीब पालटलं आहे. नारंगी रंगाच्या मोत्याची किंमत अडीच कोटी रुपये (Pearl worth 2.5 Crores) सांगितली जात आहे. (Thailand truck driver found rare orange pearl worth crores inside sea snail during lunch)

थायलंडमधील चोनबुरी प्रांतातील ट्रक ड्रायव्हर मोनथियान जानसूक हा त्याच्या पत्नीसोबत जेवण करत होता. त्यावेळी ते समुद्रामध्ये सापडणारी समुद्री गोगलगाय खात होते. ते खरेदी करण्यासाठी त्यांनी फक्त 100 रुपये खर्च केले होते. या गोगलगायीच्या आतमध्ये त्यांना नारंगी रंगाचा मोती आढळला. त्याची किंमत अडीच कोटी रुपये सांगितली जात आहे.

नारंगी मोती अडीच कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज

ट्रक ड्रायव्हर मोनथियान जानसूक मोती मिळाल्यानंतर खुश आहेत. मोनथियान यांना मोती मिळाल्याचं समजल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी मोती पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यांनी यापूर्वी असा मोती पाहिला नव्हता. मोनथियान सध्या त्या मोत्याची किंमत किती आहे, याचा अंदाज लावत आहेत. नारंगी मोत्याची किंमत सुमारे अडीच कोटी असून शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मच्छीमाराचं नशीब बदललं

मोनथियान यांच्याप्रमाण थायलंडमधील एका मच्छीमाराचंही नशीब पालटलं होते. त्यांना कोट्यवधी किंमतीचा मोती मिळाला होता. हचाई नावाचा मच्छीमार समुद्र किनाऱ्यावर शेल पकडत होता. तो शेल पकडून घरी पोहोचला तेव्हा त्याच्या वडिलांनी शेलची सफाई केली. त्यांना त्यावेळी मोती सापडला. हचाई यांना सापडलेल्या मोत्याचं वजन 7.68 ग्रॅम होते. मोती दुर्मिळ आणि मौल्यवान असल्याचं समजल्यानंतर लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. तो मोती खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र, हचाई यांनी त्याची विक्री केली नाही. हचाई यांना जादा किंमत मिळण्याची आशा आहे. नारंगी रंगाचे मोती समुद्री गोगलगाय आणि शेलच्या मध्ये मिळतात.

संबंधित बातम्या:

चीनचे अब्जाधीश जॅक माला 2 महिन्यात 80 हजार कोटींचं नुकसान, नेमकं काय झालं?

आता घर बसल्या रिन्यू करा ड्रायव्हिंग लायसन्स, खूप सोपी आहे पद्धत

(Thailand truck driver found rare orange pearl worth crores inside sea snail during lunch)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.