१५० अब्ज डॉलरचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन महासागरात कोसळणार, NASA ने का घेतला निर्णय?
एका फुटबॉल मैदानाच्या आकाराची अंतराळ प्रयोगशाळेचे वजन ४३० टन इतके प्रचंड आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ४०० किलोमीटर उंचीवरुन हे अंतराळ यान पृथ्वीला घिरट्या मारत आहे. परंतू त्याचा अवकाश आता भरत आला आहे.

एका फुटबॉल मैदानाच्या आकाराची लॅबोरेटरी अंतराळात आपल्या पृथ्वीभोवती वेगाने फिरत असते. जिला आपण इंटरनेशनल स्पेस स्टेशन म्हणत असतो. या प्रयोगशाळेच वजनच तब्बल ४३० टन इतक असून ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ४०० किलोमीटर उंचीवरुन पृथ्वीला प्रदक्षिणा मारत आहे. पृथ्वीभोवती २८ हजार किलोमीटर प्रति तास वेगाने फिरणाऱ्या या प्रयोगशाळेचे लाँचिंग साल १९९८ मध्ये करण्यात आले होते. आता पर्यंत २६ देशांचे २८० अंतराळवीर ISS वर जाऊन आले आहेत. परंतू नासा आता या अजस्र प्रयोगशाळेला प्रशांत महासागरात कोसळवण्याच्या तयारीत आहे. याचे कारण हे आहे की ISS चे प्रायमरी स्ट्रक्चर सारखे मॉड्युल, ट्रस आणि रेडिएटर खराब होत आहेत...
