AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! अमेरिकन शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये बनवला सर्वात धोकादायक कोरोना विषाणू, 80 टक्क्यांपर्यंत आहे मृत्यू दर

संशोधन करण्याच्या नादात अमेरिकेने एक नव्या कृत्रिम कोरोनाच्या व्हेरिएंटला जन्म दिला आहे. हा विषाणू इतका घटक आहे की त्याचा मृत्यू दर 80 टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

धक्कादायक! अमेरिकन शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये बनवला सर्वात धोकादायक कोरोना विषाणू, 80 टक्क्यांपर्यंत आहे मृत्यू दर
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: Oct 20, 2022 | 8:51 PM
Share

बोस्टन, अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत (Boston University Laboratory) करण्यात आलेल्या संशोधनाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. बोस्टन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने असा कृत्रिम कोविड-19 विषाणू (Artificial covid-19 virus) विकसित केल्याचा दावा केला आहे, जो कोरोनाच्या सर्व प्रकारांपेक्षा प्राणघातक आहे आणि त्याचा मृत्यू दर 80 टक्क्यांपर्यंत आहे. बोस्टन विद्यापीठाचा हा अभ्यास सार्वजनिक होताच त्यावरून वाद सुरू झाला आहे. प्रयोगशाळेतील चुकीमुळे जगात नवीन महामारी होऊ शकते अशी टीका करण्यात येत आहे.  हे प्रकरण उघड झाल्यानंतर आता अमेरिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

संशोधनाच्या नादात तयार झाला भयानक विषाणू

या अभ्यासाच्या सुरुवातीच्या तपासात, संशोधकांनी चीनमधील वुहान लॅबमधील कोविड-19 चा मूळ स्ट्रेन ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये मिसळला. प्रयोगशाळेत बनवलेल्या या कृत्रिम विषाणूसमोर ओमिक्रॉन कमी प्राणघातक असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

संशोधकांनी उंदरांवर हे संशोधन केले. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या विषाणूची लागण झालेल्या 80 टक्के उंदरांचा मृत्यू झाला. मात्र वाद वाढल्यानंतर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडून असे सांगण्यात आले की कृत्रिम विषाणू खऱ्या स्ट्रेनपेक्षा वेगाने पसरतो की नाही याची चाचणी केली गेली नाही.

कोण करतंय तपास?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) म्हणते की संशोधकांनी या संशोधनासाठी सरकारी पैसा खर्च केला असला तरी, हा अभ्यास पुढे नेण्यापूर्वी कोणताही आढावा घेतला गेला नाही. एनआयएचच्या प्रवक्त्याने सांगितले की, धोकादायक विषाणूंचा समावेश असलेल्या प्रयोगांसाठी सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार या संशोधनाचे पुनरावलोकन आवश्यक आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत.

त्याचवेळी बोस्टन युनिव्हर्सिटीने सांगितले की, या प्रकरणी एनआयएचला सतर्क करण्याची गरज नाही, कारण सरकार संशोधनासाठी थेट निधी देत ​​नाही, परंतु ते उपकरणे आणि तंत्रज्ञानामध्ये वापरले जाते.

बोस्टन युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, वैज्ञानिक आणि स्थानिक सदस्यांचा समावेश असलेल्या संस्थात्मक जैव सुरक्षा समितीने संशोधनाचे पुनरावलोकन केले आणि मंजूर केले. यासोबतच बोस्टन पब्लिक हेल्थ कमिशननेही या संशोधनाला मान्यता दिली आहे. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, आम्ही सर्व आवश्यक दायित्वे आणि प्रोटोकॉलसह हे संशोधन पूर्ण केले आहे.

संशोधनाबद्दल प्रश्न

बोस्टन युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या संशोधनाबाबत वादाला तोंड फुटले आहे. अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे संशोधन अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते, कारण चुकून संसर्ग पसरण्याचा धोका आहे, ज्यामुळे नवीन साथीचा रोग होऊ शकतो. यासोबतच अमेरिकेच्या एका गुप्तचर संस्थेचा असाही विश्वास आहे की कोविड-19 विषाणूचा उगम चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतूनच झाला असावा.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.