जगातल्या या नेत्यांना मिळाला आहे नोबेल पुरस्कार, हिटलरनेही केला होता प्रयत्न
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला तर असा पुरस्कार मिळवणारे ते पाचवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. त्यांच्या आधी चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना हा पुरस्कार मिळाला आहे. चला तर पाहूयात कोण-कोणत्या नेत्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेसाठी नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळालेले आहे. या संदर्भातील सर्वात पहिली मागणी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी मागणी केली होती. आता त्यांच्या पाठोपाठ इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देखील हीच मागणी लावून धरली आहे. पाकिस्ताननंतर इस्राईल दुसरा देश आहे ज्याने डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा ही मागणी केली आहे. यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे की शांततेचा नोबेल पुरस्कार मिळण्याचा डोनाल्ड यांना अधिकार आहे की नाही..
जर डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळाला तर नोबेल पुरस्कार मिळणारे ते 5 वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असतील, त्यांच्या आधी चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची नावे आहेत थियोडोर रुझवेल्ट, व्रुडो विल्सन, जिमी कार्टर,बराक ओबामा. अशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा यांना वगळता हा पुरस्कार आणखी कोणत्या नेत्यांना मिळालेला आहे ? क्रुरकर्मा हुकूमशहा हिटलर यालाही या पुरस्कारासाठी नॉमिनेट केले होते ?
ट्रम्प यांचे नाव वादात का सापडले?
शांततेच्या क्षेत्रात नोबेल प्राईजसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नामांकन वादात सापडले आहे. वास्तविक ट्रम्प यांच्या धोरणांनी जगात ट्रेड वॉर छेडले गेले आहे. तर पश्चिम आशियात इराण आणि इस्राईल दरम्यान अलिकडेच झालेल्या युद्धालाही ट्रम्प जबाबदार होते. जगाला माहिती आहे की ट्रम्प यांच्या इशाऱ्यानेच इस्राईलने इराणवर हल्ला करण्याचे धाडस केले. भले ट्रम्प रशिया आणि युक्रेन वॉर समाप्त करण्याची वकीली करत असले तरी ही बाब लपलेली नाही की युक्रेनला शस्रास्रे देणारा सर्वात मोठा देश अमेरिकाच आहे.
कोणेकाळी हिटलरने केलेला प्रयत्न
शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी केवळ ट्रम्पच वादा सापडलेले नाहीत, याच्या आधी या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी असे अनेक नावे नामांकित झालीत त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. एवढेच काय या यादी एडोल्फ हिटलर आणि मुसोलिनी याचेही नाव सामील आहे. जगभरात आपल्या हुकूमशाहीसाठी कुख्यात हिटलर आणि मुसोलिनी यांना देखील शांततेचा नोबेल देण्याचा प्रयत्न झाला होता. दुसरे जागतिक युद्ध सुरु होण्याआधी स्वीडनच्या एका खासदाराने 1939 मध्ये जर्मन हुकूमशाह एडोल्फ हिटलरचे नाव या पुरस्कारासाठी सुचवले होते. यानंतर प्रचंड विरोध झाला. अखेर हिटरलचे नाव वगळण्यात आले होते. हिटलरला दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा खलनायक मानले जाते.
या नेत्यांनाही मिळाले नोबेल पुरस्कार
जगात असे अनेक नेते आहेत, ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. यात चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपासून जगातील अनेक मोठ्या नेत्यांचे नाव सामील आहे. उदा. मार्टीन ल्युथर किंग ज्युनिअर, आंग सान सू की, नेल्सन मंडेला, मिखाईनल गोर्बाचेव्ह, मोहम्मद यूनुस, विंस्टन चर्चिल सारख्या नेत्यांचा यात समावेश आहे.
