AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी खासदारांची भिकाऱ्यापेक्षाही वाईट परिस्थिती, पैशांसाठी चक्क…जगभरात होतेय नाचक्की!

पाकिस्तानात महागाई हा खूप मोठा प्रश्न आहे. सध्या पाकिस्तानी खासदारांचा एक अजब व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

पाकिस्तानी खासदारांची भिकाऱ्यापेक्षाही वाईट परिस्थिती, पैशांसाठी चक्क...जगभरात होतेय नाचक्की!
pakistan parliament videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 10, 2025 | 6:32 PM
Share

पाकिस्तान हा असा देश आहे, जिथं महागाई, गरिबी, भूकबळ ही फार मोठी समस्य आहे. पाकिस्तानमधील गरिबी दूर करण्यासाठी तेथील सरकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. पण या प्रयत्नांना अजूनही यश आलेले नाही. तेथ तेल, किराना, औषधं इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी बरेच पैसे खर्च करावे लागतात. पैसे कमवण्यासाठी पाकिस्तानात मोठा संघर्ष करावा लागतो. दरम्यान, आता पैशांसाठीचा असाच एक संघर्ष थेट पाकिस्तानच्या खासदारांमध्ये दिसून आला आहे. पैसे मिळावेत म्हणून तेथील खासदारांनी एखाद्या भिकाऱ्यालाही लाजवेल अशी कृती केली आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा पाकिस्तानातील संसदेतील आहे. 8 डिसेंबर रोजीचा हा प्रसंग असल्याचे सांगितले जात आहे. सभापती अयाज सादिक यांच्या हातात काही पाकिस्तानी रुपये होते. त्यांनी है पैसे कोणाचे आहेत? असे विचारताच साधारण 12 खासदार पुढे आले. त्यांनी हे पैसे माझाचे आहेत, असा दावा केला. तब्बल 12 खासदारांनी पैसे माझेच असल्याचा दावा केल्यानंत खुद्द सभापती अयाज सादिक यांनाही हसू आवरले नाही. पाकिस्तानी संसदेतही एकच हशा पिकला.

50 हजीर रुपयांवर 12 खासदारांचा दावा

रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानच्या संसदेत एका खासदाराचे पैसे पडले होते. हे पैसे नंतर सादिक यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर ते पैसे हातात घेतले आणि ते कोणाचे आहेत? असे विचारले. सादिक यांच्याकडून विचारणा झाल्यानंतर सभागृहात बसलेल्या 12 खासदारांनी हात वर केले आणि ते पैसे माझेच आहेत असा दावा केला. सादिक यांच्या हतात 5000 पाकिस्तानी रुपयांच्या एकूण 10 नोटा होत्या. म्हणजेच सादिक यांच्याकडे एकूण 50 हजार रुपयांच्या नोटा होत्या. ते पैसे मिळावेत म्हणून 12 खासदार पुढे आले.

दरम्यान, पाकिस्तानी 50 हजार रुपयांवर 12 खासदारांनी दावा केल्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. खासदारांचे हे असे वागणे चुकीचे आहे, असे मत काहीजण व्यक्त करत आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.