बाडेन वुर्टेमबर्ग-महाराष्ट्रातील संबंध म्हणजे ‘आर्थिक महाशक्तीचे’ एक उदाहरण, न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये सचिव फ्लोरियन हॅसलर यांचे प्रतिपादन!
जर्मनीतील स्टटगार्ट येथे न्यूज9 ग्लोबल समिट पार पडत आहे. या समिटमध्ये जर्मनीतील बाडेन-वुर्टेमबर्ग राज्याचे सचिव फ्लोरियन हॅसलर यांनी मत व्यक्त केले. त्यांनी भारतासोबतच्या व्यापारावर भाष्य केले.

News 9 Global Summit : भारतातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही 9 तर्फे जर्मनीत न्यूज9 ग्लोबल समिट 2025 च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जर्मनीतील तसेच भारतातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. जर्मनीतील बाडेन-वुर्टेमबर्ग राज्याचे राज्य सचिव फ्लोरियन हॅसलर यांनीदेखील या समिटमध्ये उपस्थिती दाखवत भारत आणि बाडेन-वुर्टेमबर्ग राज्याच्या व्यापारविषयक संबंधांवर भाष्य केले. तसेच दोन्ही देशांतील भागिदारी फक्त व्यापार पातळीवरच नाही, तर दोन्ही देश आपापल्या समृद्ध संस्कृतीचे आदान-प्रदानही करतात, अशा भावना यावेली हॅसलर यांनी व्यक्त केल्या.
दहा वर्षांपूर्वी भागिदारीला सुरुवात झाली
जर्मनीतील स्टटगार्ट येथे न्यूज9 ग्लोबल समिट पार पडत आहे. या समिटच्या दुसऱ्या एडिशनमद्ये हॅसलर यांनी महाराष्ट्रा तसेच जर्मनीतील राज्य बाडेन-वुर्टेमबर्ग यांच्यातील भागिदारीच्या यशावर भाष्य केले. “आजपासून दहा वर्षांपूर्वी बाडेन-वुर्टेमबर्ग राज्या आणि महाराष्ट्राच्या भागिदारीला सुरुवात झाली. या भागिदारीच्या माध्यमातून भारत आणि जर्मनी या दोन्ही महाशक्ती एकजूट झाल्या,” असे ते म्हणाले.
जर्मनीच्या 300 कंपन्या महाराष्ट्रात सक्रिय
पुढे बोलताना त्यांनी भारतातील अनेक कंपन्या जर्मनीत सक्रिय असल्याचे सांगितले. भारत आणि जर्मनी यांच्यातील उद्योग, शिक्षण, संस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यावरही त्यांनी भाष्य केले. बाडेन-वुर्टेमबर्ग या राज्यातील साधारण 350 कंपन्या महाराष्ट्रात सक्रिय आहेत. तर भारतातील 50 पेक्षा अधिक कंपन्या या जर्मनीत कार्यरत आहेत. यावर भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांचा एकमेकांवर किती विश्वास आहे, हेदेखील स्पष्ट होते, असे मत यावेळी हॅस्लर यांनी व्यक्त केले.
ही भागिदारी म्हणजे समृद्ध…
पुढे बोलताना सांस्कृतिक देवाणघेवाणीवरही हॅस्लर यांनी भाष्य केले. भारत आणि जर्मनी यांच्यातील भागिदीर फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंतच सीमित नाही. ही भागिदारी म्हणजे समृद्ध सांस्कृतिक आदान-प्रदानाचेही एक प्रतिक आहे. दोन दशकांपेक्षाही अधिक काळापासून बाडेन-वुर्टेमबर्ग या राज्याची राजधानी स्टटगार्ट येथे भारतीय चित्रपट मोहोत्सवाचे आयोजन केले जाते. हा संपूर्ण युरोपातील सर्वात मोठा भारतीय चित्रपट मोहोत्सव आहे. यातून दोन्ही देशांच्या संस्कृतींना जोडण्याचे काम केले जाते, असे हॅस्लर यांनी यावेळी सांगितले.
