रशिया कोणत्याही क्षणी इंग्लंडवर हल्ला करणार? युद्धाचा भडका उडणार, राजदूताच्या दाव्यानं उडाली जगाची झोप
रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष चालूच आहे, गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीमुळे जगाची झोप उडाली आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष चालूच आहे, गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, मात्र अजूनही युद्धविराम होण्याची कोणतीच शक्यता दिसत नाहीये, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी अमेरिकेकडून दोन्ही देशांवर दबाव निर्माण केला जात आहे, मात्र अमेरिकेच्या प्रयत्नाला देखील यश येताना दिसत नाहीये.
दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, युक्रेनच्या राजदूतानं संयुक्त राष्ट्रात केलेल्या एका दाव्यामुळे जगाची झोप उडाली आहे. जर युरोपने रशियावर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर भीषण युद्ध होऊ शकतं. रशियाचे मिसाईल लवकरच लंडनपर्यंत पोहोचू शकतात, असा दावा संयुक्त राष्ट्रामध्ये युक्रेनचे राजदूत अँन्ड्री मेलनिक यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, रशिया मुद्दामहून नाटोचे सदस्य असलेल्या देशांना टार्गेट करत आहे. ते वारवांर नाटो देशाच्या हवाई क्षेत्रांमध्ये घुसखोरी करत आहेत. गेल्या आठवड्यात युक्रेनचे ड्रोन पोलंडपर्यंत पोहोचले होते, ते आता कधीही ब्रिटनपर्यंत पोहोचू शकतात, तसं झालं तर हे तिसऱ्या युद्धाचं कारण ठरेल.
द सन ने दिलेल्या माहितीनुसार मेलनिक यांनी असा दावा केला आहे की, सध्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे, जग जळत आहे, पण आपण काहीच करू शकत नाहीत, त्यामुळे आता युरोपीयन देशांनी देखील विचार करायला पाहिजे की युक्रेन एकटं नाही तर युक्रेन नंतर तुमचाही नंबर लागणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन कोणालाच सोडणार नाहीत, रशिया कोणत्याही क्षणी इंग्लंडवर हल्ला करू शकतो. त्यांचे मिसाईल कोणत्याही क्षणी इंग्लंडपर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे आता युरोपीयन राष्ट्रांनी विचार करायची वेळ आली आहे.
दरम्यान युक्रेनच्या राजदूतांनी इशारा देताना म्हटलं की, रशियाकडून पोलंडवर हल्ला करण्यात आला आहे, त्यामुळे आता इंग्लंडवर देखील हल्ला होऊ शकतो.त्यामुळे हा वाढत असलेला तणाव वेळीच थांबवला नाही तर तिसर महायुद्ध होऊ शकतं, आता युरोपीय देशांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
