100 किलोमीटरपर्यंत सोनचं सोनं, तेलाने मालामाल देशाचं नशीब उघडलं
मन्सौराह मसारापासून 400 मीटर आणि ड्रिलिंग साइट्सवर घेतलेल्या नमुन्यांवरून 10.4 ग्रॅम प्रति टन सोने आणि 20.6 ग्रॅम प्रति टन सोन्याहून उच्च दर्जाचा सोन्याचा साठा येथे दिसून आला आहे. म्हणजेच इथल्या सोन्याची घनता ही सर्वात जास्त आहे.

सौदी अरेबिया | 31 डिसेंबर 2023 : तेल साठ्यासाठी जगभरात प्रसिध्द असलेल्या सौदी अरेबियाचे नशीब पुन्हा उघडले. सौदी अरेबियातील पवित्र अशा मक्का शहरात सोन्याचे प्रंचंड मोठे भांडार सापडले आहे. सौदी अरेबियाची खाण कंपनी मादेनने ही माहिती दिली. नवीन शोधात सापडलेला हा सोन्याचा साठा सध्याच्या मन्सूरह मसारा सोन्याच्या खाणीपासून 100 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे अशी माहिती कंपनीने दिली. खनिज उत्पादनाच्या उद्देशाने मॅडेन प्रोग्राम अंतर्गत हा पहिला शोध लागला आहे. तेलाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियामध्ये एवढा मोठा सोन्याचा साठा सापडणे ही त्याच्या तिजोरीत महत्त्वाची भर पडू शकेल असे मानले जाते.
मन्सौराह मसारापासून 400 मीटर आणि ड्रिलिंग साइट्सवर घेतलेल्या नमुन्यांवरून 10.4 ग्रॅम प्रति टन सोने आणि 20.6 ग्रॅम प्रति टन सोन्याहून उच्च दर्जाचा सोन्याचा साठा येथे दिसून आला आहे. म्हणजेच इथल्या सोन्याची घनता ही सर्वात जास्त आहे, असा दावा खाण कंपनीने केला आहे.
मेडेनचे सीईओ रॉबर्ट विल्ट यांनी सांगितले की, कंपनीचे सोने आणि फॉस्फेटचे उत्पादन दुप्पट करण्याची ही योजना आहे. मॅडेनची 67 टक्के मालकी ही सार्वजनिक गुंतवणूक निधीमध्ये आहे. हा निधी राज्याचा $700 अब्ज इतका आहे. तसेच, आखाती क्षेत्रात सर्वात मोठा खाण कामगार असलेली ही एकमेव कंपनी आहे.
जानेवारी 2023 मध्ये कंपनीने परदेशातील खाण मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी PIF सह संयुक्त उपक्रम, मनारा मिनरल्सची घोषणा केली. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन 2030 कार्यक्रम आखला आहे. सौदी अरेबियाला तेल अवलंबत्वापासून मुक्त करण्याची त्यांची हो योजन आहे. त्यांच्या मोठ्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते सोन्याचा सर्वात मोठा धारक म्हणून सौदी अरेबिया जगात 18 व्या क्रमांकावर आहे. तसेच सोन्याचा साठा करण्याबाबत अरब देशांपेक्षा सौदी अरेबियाअनेक पटींनी पुढे आहे. 2023 पर्यंत मन्सूरह आणि मसाराह यांच्याकडे अंदाजे 7 दशलक्ष औंस सोन्याचे स्त्रोत होते. ज्याची उत्पादन क्षमता वार्षिक 250,000 औंस होती. ज्या ठिकाणी हा सोन्याचा साठा सापडला आहे त्या ठिकाणचे छायाचित्र मॅडेन कंपनीने शेअर केले.
जगातील सोन्याच्या साठ्याचा महत्वाचा केंद्रबिंदू असण्याची क्षमता सौदी अरेबियामध्ये आहे. मात्र, यासाठी अधिक जागतिक दर्जाच्या शोधांची आवश्यकता आहे. हा शोध येत्या काही वर्षांमध्ये लागणाऱ्या अनेक शोधांपैकी पहिला शोध आहे असेही मॅडेन कंपनीने म्हटले आहे.
