डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियात घुसून करणार होते किंम जोंग उनचा गेम, पण झालं असं की…
2019 मध्ये डोनाल्ड ट्रम्प किम जोंग उन यांच्याशी अणु चर्चा करण्याची तयारी करत होते. त्यावेळी अमेरिकेने उत्तर कोरियावर दबाव वाढवण्यासाठी एक खास योजना आखली होती, मात्र यात त्यांना यश मिळाले नाही.

अमेरिका हा देश जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यामुळे जो देश अडथळा ठरेल त्याचा काटा काढण्याचा अशी अमेरिकेची रणनीती आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा गेम करण्याची योजना आखली होती. 2019 मध्ये डोनाल्ड ट्रम्प किम जोंग उन यांच्याशी अणु चर्चा करण्याची तयारी करत होते. त्यावेळी अमेरिकेने उत्तर कोरियावर दबाव वाढवण्यासाठी एक खास योजना आखली होती, मात्र यात त्यांना यश मिळाले नाही.
न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प सरकारने किम जोंग ऊन यांचे कॉल ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला होता. याद्वारे किम जोंग ऊन यांच्या योजनांबाबत माहिती चोरण्याची योजना होती, मात्र अमेरिकेला यात यश मिळाले नाही. 2019 च्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या परवानगीनंत यूएस नेव्ही सील टीम 6 ने उत्तर कोरियात एक गुप्त मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत एक इलेक्ट्रॉनिक उपकरण उत्तर कोरियाच्या जमिनीवर बसवायचे आणि त्याद्वारे किम जोंग उन यांच्यावर नजर ठेवायची अशी योजना होती. अमेरिकेने या खास मोहिमेसाठी बरेच महिने तयारी केली होती. मात्र काही अडचणींमुळे अमेरिकेला यात यश मिळाले नाही. यामागे नेमकी काय कारणे होती याबाबत माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेची मिशन फेल का झाली?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या परवानगी नंतर या मोहिमेला सुरुवात झाली होती. अमेरिकन सील दोन लहान मिनी-पाणबुड्यांमध्ये बसले आणि उत्तर कोरियाच्या किनाऱ्यावर पोहोचले. दोन तास पाण्याखाली फिरल्यानंतर हे सील उत्तर कोरियाच्या किनाऱ्याजवळील निवडलेल्या भागात पोहोचले. दोन्ही मिनी-पाणबुड्या सरळ रेषेत उभ्या करायच्या, त्यानंतर एक टीम किनार्यावर जाईल आणि ती डिव्हाईस बसवेल अशी योजना होती. मात्र एक मिनी-पाणबुडी त्याच्या नियुक्त जागेच्या पुढे गेली. त्यामुळे ताळमेळ बिघडला आणि मोहिमेसाठी उशिर झाला.
आणखी एक कारण म्हणजे या मिशनसाठी मर्यादित माहिती आणि संसाधने होती. ड्रोन फीड किंवा हवाई फोटो उपलब्ध नव्हते. टीमला केवळ उपग्रहांनी दिलेल्या कमी दर्जाच्या प्रतिमांच्या मदतीने हा मोहीम फत्ते करायची होती. आवश्यक माहितीचा अभाव होता तरीही सील अंधारात किनाऱ्याकडे पोहत गेले, त्यावेळी त्यांना वाटले की येथे कुणीही नाही, मात्र त्यांना एक बोट दिसली. या बोटीवर उत्तर कोरियाचा क्रु होता. या क्रुने वेटसूट घातला होता, त्यामुळे अमेरिकन सीलकडे असलेल्या नाईट व्हिजन उपकरणांना ही बोट दिसली नव्हती.
अंधारात अमेरिकन पाणबुड्यांचे कॉकपिट हॅच उघडले, त्यामुळे मोटर्सचा आवाज झाला आणि प्रकाश झाला, त्यामुळे उत्तर कोरियाच्या बोटीला संशय आला. यानंतर बोट जवळ येऊ लागली आणि टीमने टॉर्चच्या मदतीने प्रकाशाने पृष्ठभागाची तपासणी सुरू केली. ही बोट पाणबुड्यांच्या जवळ आली होती. मात्र सुदैवाने पाणबुड्या सापडल्या नाहीत. मात्र या घटनेमुळे मोहीम तात्काळ रद्द करण्यात आली. किनार्याकडे गेलेले लोक मिनी पाणबुड्यांकडे परतले व ही मोहीम अयशस्वी झाली.
किम जोंग आणि ट्रम्प यांच्यात भेट
जून 2019 मध्ये किम जोंग उन आणि ट्रम्प यांची भेट झाली. किम जोंग उन यांना अण्वस्त्र कार्यक्रम बंद करायला लावायचा असा अमेरिकेचा प्रयत्न होता. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोघांमध्ये तीन चर्चा झाल्या. अनेक पत्रांची देवाणघेवाण झाली. मात्र यातून तोडगा निघाला नाही.
