AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा झटका

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना अमेरिकेने मोठा झटका दिला आहे. एकीकडे भारतासोबत सतत पंगा घेण्याच्या तयारीत असलेल्या जस्टिन ट्रुडो यांंना ट्रम्प यांनी अडचणीत आणलंय. जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणी वाढल्या तर त्यांना यामुळे लवकरच होणाऱ्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणार आहे.

भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा झटका
| Updated on: Nov 26, 2024 | 7:41 PM
Share

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून पदभार स्वीकारला नसला तरी त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्ष होताच ते काय काय करणार आहेत याचा ट्रेलर त्यांनी दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतासोबत पंगा घेणाऱ्या कॅनडा सरकारला डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा झटका दिला आहे. त्यामुळे कॅनडाच्या अडचणी वाढणार आहेत. ट्रम्प यांनी घोषणा केली की ते कॅनडातून अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक उत्पादनावर 25 टक्के शुल्क लावणार आहेत. कॅनडाशिवाय अमेरिकेच्या शेजारील देश मेक्सिकोमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवरही ते 25 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. तर चीनमधून येणाऱ्या उत्पादनांवर 10 टक्के शुल्क लागू करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांचा आरोप काय

बेकायदेशीर स्थलांतरित आणि ड्रग्ज रोखण्यात अपयशी ठरलेल्या कॅनडा आणि मेक्सिकोविरुद्ध हे प्रस्तावित शुल्क आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, ट्रम्प हे 20 जानेवारीला व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करताच कॅनडा, मेक्सिको आणि चीनविरुद्ध शुल्क लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करतील. ट्रम्प म्हणाले की, “प्रत्येकाला माहित आहे की कॅनडा आणि मेक्सिकोमधून हजारो लोक अमेरिकेत दाखल होत आहेत. हे लोकं त्यांच्यासोबत ड्रग्ज आणतात. येथे येऊन अनेक गुन्हे करत आहेत.

ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावरही टीका केलीये. ट्रुडो यांना त्यांनी ‘डाव्या बाजूचा वेडा’ असे संबोधले आहे. अमेरिकेत जेव्हा नवा राष्ट्राध्यक्ष निवडून येतो तेव्हा पद स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदा कॅनडा किंवा मेक्सिकोच्या दौऱ्यावर जातात. परंतू 2017 मध्ये ट्रम्प यांनी पहिली परदेश भेट सौदी अरेबियाला दिली होती. त्यामुळे ट्रम्प यांचा कॅनडाविरुद्ध राग असल्याचं दिसून आलं.

कॅनडाची स्थिती आधीच वाईट

कॅनडाची आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक आहे. आता ट्रम्प यांच्या या नव्या घोषणेमुळे ती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कॅनडाची 75 टक्के निर्यात अमेरिकेत जाते. त्यामुळे त्यावर जर 25 टक्के दर लावला तर ते कॅनडाला महागात पडू शकते. कॅनडामध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. त्यात ट्रम्प यांनी हे शुल्क लागू करण्याची घोषणा केल्याने जस्टिन ट्रुडो यांना आणि त्यांचा पक्ष कंझर्व्हेटिव्ह पक्षाला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू शकतो. सर्वेक्षणांतून देखील तसे दिसून आले आहे.

चीन आणि भारताशी कॅनडाचे संबंध आधीच खराब आहेत. त्यामुळे जर त्याचे अमेरिकेसोबत ही व्यावसायिक संबंध बिघडले तर त्यांना अवघड होईल. कॅनडाने इतर देशांसोबत व्यवसाय सुरु केला तरी ते लगेच इतके सोपे होणार नाही. कॅनडाचे ट्रूडो सरकार खलिस्तानी दहशतवाद्यांना भारताविरोधात पाठिंबा देत आहेत. इतकंच नाही तर ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवाद्याला ठार मारल्याचा आरोपही जाहीरपणे केलाय. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ही बिघडले आहेत.

जस्टिन ट्रुडो गेल्यानंतर कॅनडात जे कोणाचं सरकार येईल त्यांना भारतासोबत मैत्री करावे लागेल. कारण भारत हे एक मोठं मार्केट आहे. कॅनडामध्ये राहणे परवडणारे नाही. महागाई सातत्याने वाढत आहे. त्यात आता अमेरिका सातत्याने शुल्क वाढवत आहे. त्यामुळे कॅनडाला व्यावसायिक आणि सामरिकदृष्ट्या भारतासोबत मैत्री करावी लागणार आहे. भारताची अर्थव्यवस्था एकीकडे वाढत असताना ती जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.