AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा युद्ध पेटणार? दोन देशांची युती, ‘या’ देशावर करणार भीषण हल्ला

अमेरिका आणि इस्रायल पुन्हा एकदा इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे. तेहरान, तेल अवीव आणि वॉशिंग्टनमधून याचे 3 मोठे संकेत मिळाले आहेत.

पुन्हा युद्ध पेटणार? दोन देशांची युती, 'या' देशावर करणार भीषण हल्ला
iran vs israel new war
| Updated on: Aug 19, 2025 | 9:02 PM
Share

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता 2 महिन्यांनंतर अमेरिका आणि इस्रायल पुन्हा एकदा इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे. तेहरान, तेल अवीव आणि वॉशिंग्टनमधून याचे 3 मोठे संकेत मिळाले आहेत. कारण अमेरिकेने डिएगो गार्सिया नौदल तळावर पुन्हा सैनिक तैनात केले आहेत. तसेच तेहरानमधील खामेनी यांच्या लष्करी सल्लागारानेही युद्ध होण्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जूनच्या मध्यात इराण आणि इस्रायलमध्ये 12 दिवसांचे युद्ध झाले होते. या युद्धात एक डझनहून अधिक इराणी अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी कमांडरचा मृत्यू झाला होता. तसेच 600 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. या युद्धात इस्रायलचेही मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

युद्ध सुरु होण्याची शक्यता का आहे?

पहिले कारण

न्यूजवीकने अलिकडेच काही सॅटलाइट फोटोंचे विश्लेषण केले आहे. यानुसार अमेरिकेने डिएगो गार्सिया या नौदल तळावर पुन्हा सैनिक तैनात केले आहेत. इराणवर याआधी केलेल्या या हल्ल्यापूर्वीही अमेरिकेने येथे आपले सैनिक आणि जहाजे तैनात केली होती. त्यानंतर अमेरिकेने इराणवर थेट बी-2 बॉम्बर्सने हल्ला केला होता. डिएगो गार्सिया हे तळ हिंदी महासागराच्या मध्यभागी आहे. हे चीन आणि इराणपासून 2000 किमी अंतरावर आहे. याठिकाणावरून दोन्ही देशांवर सहज लक्ष ठेवता येते.

दुसरे कारण

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे लष्करी सल्लागार रहीम सफवी यांनी युद्ध होण्याची शक्यता वर्तवली आहे. आम्ही युद्धबंदीच्या स्थितीत नाहीत तर युद्धाच्या टप्प्यात आहोत. इराण आणि अमेरिका किंवा इस्रायलमध्ये युद्धबंदीबाबत कोणताही लेखी करार नाही झालेला नाही. त्यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये कधीही युद्ध सुरू होऊ शकते असं रहीम सफवी यांनी म्हटलं होतं. तसेच इराणच्या उपराष्ट्रपतींनी आता युद्ध सुरू झाले तर इराणचा विजय होईल असं विधान केलं होते.

तिसरे कारण

अमेरिका आणि इस्रायलने इराणला युरेनियम नष्ट करण्यासाठी ऑगस्टची अंतिम मुदत दिली आहे. काही दिवसांपूर्वी इराणने आंतरराष्ट्रीय अणु संघटनेच्या अधिकाऱ्यांना आपल्या देशात बोलावले होते, मात्र इराणने त्यांना युरेनियमचा डेटा दिला नव्हता. त्यामुळे आता अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.