अवघ्या 3 दिवसात संपूर्ण जगाची भटकंती, महिलेचा विक्रम, कोण आहेत ख्वाला-अल-रोमेथी?

दुबईतील एका महिलेने केवळ 84 तासात संपूर्ण जगाची भटकंती करत नवा विक्रम रचला आहे.

अवघ्या 3 दिवसात संपूर्ण जगाची भटकंती, महिलेचा विक्रम, कोण आहेत ख्वाला-अल-रोमेथी?


दुबई : जागतिक स्तरावरील लेख जूल्स वर्ने (Jules Verne) यांच्या एका कादंबरीत 80 दिवसांमध्ये संपूर्ण जगाची भटकंती करणाऱ्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. असं करणं हे या कादंबरीतील वर्णनाप्रमाणे असामान्य गोष्ट आहे. मात्र, वर्ने यांना कादंबरीतील आपल्या पात्राचा विक्रम मोडेल असं वाटलं नसेल. मात्र, दुबईतील एका महिलेने या पात्राचा काल्पनिक विक्रम मोडत केवळ 84 तासात संपूर्ण जगाची भटकंती केली आहे. तिच्या या प्रवासाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय. (USE woman Khawla Al Romaithi sets Guinness World Records by traveling world 7 continents in 3 days).

तिच्या या जगभटकंतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) दखल घेत नोंद केली आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या या महिलेचं नाव डॉ. ख्वाला-अल-रोमेथी (Dr. Khawla Al Romaithi) असं आहे. त्यांनी 208 देशांचा प्रवास केवळ 3 दिवस, 14 तास आणि 46 मिनिटांमध्ये केला आहे. या महिलेने 13 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियातील (australia) सिडनीत आपला हा अनोखा प्रवास संपवला.

अल-रोमेथी यांच्या या अनोख्या विक्रमाविषयी आणि अनुभवाविषयी गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्सने आपल्या ब्लॉगवर (Guinness Book of records Blog) लिहिलं की, “अल-रोमेथी यांना हा प्रवास करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांनी आपल्या धैर्याने या अडचणींचा सामना केला आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं.”

अल-रोमेथी यांनी स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्रासह आपला फोटो शेअर केला. त्या म्हणाल्या, “मला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नेहमीच आकर्षित करत आलंय. मी जे काही केलंय ते पाहता हे प्रमाणपत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी खूप आनंदी आहे.”

संबंधित बातम्या :

बापरे! लांबच लांब टांग, अमेरिकेतील तरुणीने वेधले जगाचे लक्ष, गिनीज बुकमध्ये नोंद

ओजल नलवडीचे ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंगमध्ये 13 विक्रम, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद

जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेच्या घरात चोरी

व्हिडीओ पाहा :

USE woman Khawla Al Romaithi sets Guinness World Records by traveling world 7 continents in 3 days

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI