या मुस्लीम देशात 3 दिवसांमध्ये एक हजारापेक्षा अधिक अल्पसंख्यांक लोकांची हत्या; नेमकं काय घडलं?
सीरियामध्ये मोठा हिसांचार उफाळला आहे, सीरियामध्ये सध्या गृहयुद्धाची परिस्थिती आहे. या संघर्षात आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

सीरियामध्ये मोठा हिसांचार उफाळला आहे, सीरियामध्ये सध्या गृहयुद्धाची परिस्थिती आहे. या संघर्षात आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये नागरिक, सरकारी कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि बंडखोर यांचा समावेश आहे. सीरियामध्ये स्थापन झालेलं नवं सरकार आणि सीरियाचे माजी राष्ट्रपती बशर अल- असद यांच्या समर्थकांमध्ये ही लढाई सुरू झाली आहे.सीरियामध्ये अचानक उफाळलेल्या या हिंसाचारामध्ये देशातील वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित झाला आहे. हजारो लोकांनी आतापर्यंत आपल्या घरापासून दूर स्थलांतर केलं आहे. ब्रिटन स्थित सिरीयन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या चौदा वर्षांमध्ये सीरियात जेवढे गृहयुद्ध झाले त्यातील सर्वात भायानक हा हिसांचार आहे.
नेमकं असं काय घडलं?
सीरियावर गेल्या 50 वर्षांपासून बशर अल-असद यांचं शासन होतं. मात्र 2024 मध्ये त्यांना पायउतार व्हाव लागलं. बशर अल- असद यांची सत्ता गेल्यानंतर सीरियामध्ये एक नवं राजकीय समीकरण तयार झालं. त्यामुळे बशर अल- असद यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये जुंपली, संघर्षाचा वणवा पेटला. बशर अल- असद यांच्या समर्थकांनी नव्या सरकारविरोधात उठाव केला आहे, त्यानंतर आता स्थापन झालेल्या नव्या सरकारने देखील याविरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे येथे हिंसाचार उफळला आहे.
असद यांची सत्ता गेल्यानंतर आता त्यांचे समर्थक असलेल्या तेथील अलावी समुदायाला निशाणा बनवण्यात येत आहे. सीरियामधील बंडखोर सुन्नी गट असं मानतो की बशह अल- असद यांच्या काळात तेथील अलावी समुदायाला विशेष लाभ देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या अलावी समाजावर तिथे हल्ले होत आहेत. असद समर्थक अलावी समाजाचा गड मानल्या जाणाऱ्या लताकिया प्रदेशात सीरिया सुरक्षादलाने एकाच वेळी तब्बल 162 जणांना मारल्याची बातमी देखील समोर आली आहे.सीरियामध्ये अलावी समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या बारा टक्के इतकी आहे. ते शिया मुस्लिमांना फॉलो करतात, त्यामुळे सुन्नी समाज त्यांच्याविरोधात आहे, त्यांच्यावर हल्ले होते आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये तिथे तब्बल एक हजार लोकांना मारण्यात आलं आहे.
