AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत पाकिस्तान सीमेवरील रात्रीच्या वेळीस दिसणाऱ्‍या अद्भूत दृश्याचा व्हायरल व्हिडिओ, इंडिगो पायलटने केला शेअर

विमानाच्या कॉकपिटमधून दिसणारे हे सुंदर दृश्य भारत आणि पाकिस्तान मधली रॅडक्लिफ रेषा दाखवते. यामध्ये दोन्ही बॉर्डरवर दिव्यांच्या रोषणाईमध्ये खूप मनमोहक दिसत आहेत. तर इंडिगो पायलेटने या दृश्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केलेला आहे ते आजच्या लेखात पाहूयात.

भारत पाकिस्तान सीमेवरील रात्रीच्या वेळीस दिसणाऱ्‍या अद्भूत दृश्याचा व्हायरल व्हिडिओ,  इंडिगो पायलटने केला शेअर
India-pak borderImage Credit source: instagram
| Edited By: | Updated on: May 27, 2026 | 4:53 PM
Share

भारत- पाकिस्तान सीमेचा एक मनमोहक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. इंडिगोचे पायलेट कॅप्टन प्रदीप कृष्णन यांनी हा व्हिडिओ त्यांच्या कॉकपिटमधून रेकॉर्ड केला आहे. रात्रीच्या अंधारात आकाशातून दोन्ही देशांची बॉर्डर कशी दिसते, हे या क्लिपमध्ये स्पष्टपणे दिसून येते. हे दृश्य पाहणे खरोखरच खूप मनमोहक आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात प्रकाशाची एक चमकणारी पट्टी दिसत आहे. ही चमकणारी रेषा म्हणजे रॅडक्लिफ लाईन, भारत आणि पाकिस्तानला विभागणारी सीमारेषा आहे. यामध्ये कडेकोट पहारा असलेल्या सीमेवर दोन्ही देशांच्या चौक्या आणि सुरक्षा कॅम्प दिसत आहेत, ज्यांचे दिवे आकाशातून पाहिल्यास ताऱ्यांच्या समूहासारखे दिसतात. हे दृश्य इतके सुंदर दिसत आहे की, पहिल्यांदा पाहिल्यावर त्यावर विश्वासच बसत नाही.

तर यावेळी व्हिडिओमध्ये कॅप्टन प्रदीप कृष्णन प्रवाशांना यासंबंधीत सांगत आहे की “प्रिय प्रवाशांनो… तुम्ही विमानाबाहेर पाहिल्यास, तुम्हाला जगातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षा असलेली भारत-पाकिस्तानची सीमा दिसेल: ”

हा प्रकाश अंतराळातूनही दिसतो

पायलटने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “भारत-पाकिस्तान सीमेवरील हे दिवे इतके तेजस्वी आहेत की ते अंतराळातूनही दिसू शकतात. मध्यरात्रीच्या अंधारात चमकणारे हे दिवे खरोखरच नेत्रदीपक आहेत.”

नेटकरी हा व्हिडिओ पाहून मंत्रमुग्ध झाले आहेत आणि विविध प्रकारच्या कमेंट देत आहेत. एकाने नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, “राजकारण आणि इतिहासाच्या कटुतेने विभागलेले, दोन्ही बाजूंना प्रेमळ लोक राहतात. तर ” दुसऱ्याने गंमतीने लिहिलं आहे की, “सगळं ठीक आहे, पण या सीमेची विजेची बिलं कोण भरतं?” आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, “हे दृश्य म्हणजे एकत्र वाहणाऱ्या, पण कधीही भेटू न शकणाऱ्या दोन महासागरांसारखे आहे.”

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट