AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70 व्या वर्षात तरुणांसारखे दिसतात… पुतिन यांच्याकडे 150 वर्ष जगण्याचा सीक्रेट फॉर्म्युला?; जिनपिंग यांच्याशी बोलताना लिक झाली चर्चा

चीनची विजयी परेड सुरु होण्याच्या काही वेळ आधी व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यात झालेल्या गुफ्तगूचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही नेत्यांनी दीडशे वर्षे जीवंत राहण्यावर चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही नेत्यांनी सत्तरी ओलांडली आहे.

70 व्या वर्षात तरुणांसारखे दिसतात... पुतिन यांच्याकडे 150 वर्ष जगण्याचा सीक्रेट फॉर्म्युला?; जिनपिंग यांच्याशी बोलताना लिक झाली चर्चा
putin and xi jinping
| Updated on: Sep 04, 2025 | 7:08 PM
Share

चीनच्या विजयी परेडने जगभरात चीनच्या ताकदीचे धडकी भरवणारे प्रदर्शन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले आहे. चीनच्या या व्हीक्ट्री परेडला शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि नॉर्थ कोरियाचे हुकमशहा किम जोंग उन यांच्यातील गुफ्तगुचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात पुतिन आणि शी जिनपिंग १५० वर्षे कसे जगायचे यावर गहन चर्चा करत असल्याचे दिसत आहे.त्यावर हुकूमशहा किम जोंग उन दोघांच्या गप्पा ऐकून हसताना दिसत आहेत. मायक्रोफोनवर रेकॉर्ड झालेल्या या जागतिक नेत्यांमध्ये बॉयो टेक्नोलॉजीवर चर्चा झाल्याचे उघड झाले आहे.

बॉयो टेक्नोलॉजीद्वारे 150 वर्षे जगणार पुतिन-जिनपिंग!

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या बातमीनुसार यावेळी पुतिन यांच्याकडे पाहात शी जिनपिंग म्हणाले की, ‘लोक कदाचित ७० वर्षांहून अधिक जीवंत रहात आहेत.परंतू तर आजही ७० व्या वयातही मुलासारखे दिसताय.यावर पुतिनच्या ट्रान्सलेटरना चीनी भाषेत हे सांगताना ऐकले गेले आहे की बॉयो टेक्नोलॉजी सातत्याने विकसित होत आहे. ट्रान्सलेटर म्हणाला की,’ बॉयो टेक्नोलॉजीच्या विकासासोबत मानवी अवयवांना सतत ट्रान्सप्लांट कले जात आहे. लोक वाढत्या वयातही तरुण होऊ शकतात आणि एवढंच काय अमर देखील होऊ शकतात.’

पुतिन-जिनपिंग दरम्यान 150 वर्षे जगण्यावर चर्चा

त्यानंतर चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की अशी भविष्यवाणी आहे की या शतकातील लोकांना १५० वर्षे जीवंत रहाण शक्य होऊ शकते.त्यानंतर पुतिन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की ते जेव्हा परेड पाहायला जात होते त्यावेळी या विषयावर चर्चा झाली. पुतीन यांनी म्हटले की मेडिकल क्षेत्रात जेवढे डेव्हलपमेंट झाले आणि त्यानंतर ऑर्गन रिप्लेसमेंटमुळे संबंधित सर्व प्रकारच्या सर्जरी लोकांना आशा देते की येत्या काळात वेळ बदललेली असेल आतासारखी काही नसणार. यावर विशेष तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की केवळ ऑर्गन रिप्लेसमेंमुळे वृद्धत्वाला रोखता येणार नाही.

शी जिनपिंग आणि पुतिन दोघेही ७२ वर्षांचे झाले आहेत.दोघांपैकी कोणीही आपला उत्तराधिकारी जाहीर केलेला नाही. जिनपिंग यानी चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची वयोमर्यादाच समाप्त केली आहे.तर पुतिन यांनी कायद्यात बदल करीत स्वत:ला साल २०३६ पर्यंत रशियाचा अध्यक्ष करुन घेतले आहे. पुतीन आणि शी जिनपिंग यांनी ऊर्जापासून ते एआय क्षेत्रापर्यंत २० हून अधिक करारावर हस्तांक्षर केले आहे. याशिवाय त्यांच्या गॅसपाईप लाईनच्या निर्मितीवर एकमत झाले आहे.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.