American Delta Force : अमेरिकेची डेल्टा फोर्स आहे तरी काय? अतिशय सिक्रेटपणे शत्रूला संपवते!
व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत. मादुरो यांना अमेरिकेच्या डेल्टा फोर्सने ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच ही डेल्टा फोर्स काय आहे? असे विचारले जात आहे.

America Delta Force : व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैनिकांनी ताब्यात घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच तसा दावा केला आहे. अमेरिकेच्या या कारवाईनंतर आता ‘डेल्टा फोर्स’ हे नाव फारच चर्चेत आले आहे. या फोर्सनेच मादुरो यांना ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेची डेल्टा फोर्स नेमकी काय आहे? डेल्टा फोर्सच्या सैनिकांना प्रशिक्षण कसे दिले जाते? तसेच अमेरिकेतील ही डेल्टा फोर्स जगातील सर्वाधिक घातक का मानली जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
काय आहे डेल्टा फोर्स?
अमेरिकेतील सैन्यात डेल्टा फोर्स ही सर्वात रहस्यमयी आणि संहारक असे एक यूनिट आहे. हे डेल्टा युनिट सर्वाधिक महत्त्वाच्या तशाच हाय प्रोफाईल प्रकरणात अॅक्शन मोडमध्ये येते. मादुरो सध्या याच टास्क फोर्सच्या ताब्यात आहेत. डेल्टा फोर्सचे अधिकृत नाव स्पेशल फोर्सेस ऑपरेशनल डिटॅचमेंट-डेल्टा (SFOD-D) असे आहे. अमेरिकन लष्करातील ही एक सार्वाधिक विशेष आणि स्पेशल ऑपरेशन तुकडी आहे. दहशतवादविरोधी कारवाया करणे, हाय व्हॅल्यू टार्गेटला पकडणे, बंदी केलेल्या लोकांची सुंटका करणे अशी जोखमीची कामे या यूनिटकडे असते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सर्वाधिक जोखमीची आणि कठीण अशी कामे डेल्टा फोर्स करते.
डेल्टा फोर्सची स्थापना कधी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या या डेल्टा फोर्सची स्थापना 1970 साली झाली. या काळात जगभरात दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या. ब्रिटनमध्ये एसएएस (स्पेशल एअर सर्व्हिस) नावाने लष्कराची एक तुकडी आहे. ही तुकडी अतिशय कठीण आणि जोखमीच्या मोहिमांवर असते. अमेरिकेतही असेच एखादे युनिट असावे या उद्देशाने या डेल्टा फोर्सची स्थापना करण्यात आली.
डेल्टा फोर्समधील सैनिकांना कसे प्रशिक्षण दिले जाते?
डेल्टा फोर्समध्ये सामील होण्यासाठी सैनिकांना अतिशय कठीण परीक्षेतून जावे लागते. कठीण ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आणि या ट्रेनिंगमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच संबंंधि सैनिकांचा डेल्टा फोर्समध्ये समावेश केला जातो. या फोर्सच्या सैनिकांना सहा महिने प्रशीक्षण पूर्ण करावे लागते, त्यानंतरच एखाद्या सैनिकाला डेल्टा फोर्समध्ये समाविष्ट केले जाते.
दरम्यान, अमेरिकन सैनिकांनी कधीच डेल्टा फोर्स अस्तित्त्वात असल्याचे मान्य केलेले नाही. त्यामुळे अजूनही ही डेल्टा फोर्स अमेरिकेत एक गूढ आहे.
